तांबापुरात बिस्मिल्ला चौक एका बंद घर फोडले ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तांबापुरात बिस्मिल्ला चौक एका बंद घर फोडले ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील तांबापुरा बिस्मिल्ला चौक येथील एका मजुराचे बंद घर फोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ६८ हजार ५०० रुपये किमतीचे मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सोमवारी १९ डिसेंबर रोजी ९ वाजता अज्ञात व्यक्ति विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मजिद शाह हसन शाह फकिर, ( वय-५१) रा. बिस्मिल्ला चौक तांबापुर हे आपल्या परिवारास वास्तव्याला आहे. मजुरी करून आपल्या परिवारास उदरनिर्वाह करतात. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता ते घराला कुलुप लावुन बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ६८ हजार ५०० रुपये किमतीच्या मुद्देमाल चोरून नेला. सोमवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मजिद शाह हसन शाह फकीर हे घरी आल्यावर त्यांच्या घराच्या कुलुप तोडून फेकलेले दिसुन आले. घरात गेल्यावर अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांनवरुन रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायकल फौजदार अतुल वंजारी करत आहे.