ताज्या घडामोडी

आमदार बच्चू कडू यांचा अपघात…स्वतः कडू यांनी माहिती केली शेयर

आमदार बच्चू कडू यांचा अपघात…स्वतः कडू यांनी माहिती केली शेयर

एकनाथ शिंदे गटाला समर्थन करणारे, प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत.

आज सकाळी अमरावतीत सहा ते साडेसहाच्या दरम्यान बच्चू कडू रस्ता ओलांडत होते. तेव्हा एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू जखमी झाले आहेत. अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु असून, डोक्याला, हाताला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच, बच्चू कडू त्यांची प्रकृति ठीक आहे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!