ताज्या घडामोडी

मेहरूण परिसरात जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मेहरूण परिसरात जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील पोल्ट्री फार्मजवळ एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापात केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, राजकुमार प्रमोद मोरे, (वय-१७) रा. हनुमान नगर मेहरूण जळगाव हा मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जुन्या वादातून राजकुमार मोरे, यावा त्याच भागात राहणारे लोकेश मुकेश सोनवणे, हर्षल राकेश सोनवणे, प्रफुल रमेश नेरकर आणि मानस भरत भोई, सर्व रा. मेहरून जळगाव यांनी मेहरुण येथील पोल्ट्री फार्मजवळ लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापात केली. हा प्रकार घडल्यानंतर राजकुमार मोरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी लोकेश मुकेश सोनवणे, हर्षल राकेश सोनवणे, प्रफुल रमेश सोनवणे, आणि मानस भरत भोई, सर्व रा. मेहरून जळगाव यांच्या विरोधात रविवारी २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो.हे.कॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!