ताज्या घडामोडी

मोबाईल चोरी करणारी झारखंड राज्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी लासलगाव पोलीसांनी मुस्क्या आवळल्या

संपादक राहुल वैराळ

मोबाईल चोरी करणारी झारखंड राज्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी लासलगाव पोलीसांनी मुस्क्या आवळल्या

३,३१,००० मुददेमाल जप्त लासलगाव पोलीसांची मोठी कारवाई

खंडु बाबुराव वाळके , रा . पिंपळद वाळकेवाडी , ता . चांदवड , जि . नाशिक यांचे फिर्यादी वरुन लासलगाव पोलीस ठाणे भादवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक २५-०९ -२०२२ रोजी गुन्हा दाखल होतो लासलगाव येथील आठवडे बाजारातुन मोबाईल चोरी जात असल्याने त्यास प्रतिबंध होण्यासाठी मा.सचिन पाटील , पोलीस अधीक्षक , नाशिक ग्रामीण , मा . माधुरी कांगणे , अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मा . सोमनाथ तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांनी आदेशित केल्या प्रमाणे लासलगाव आठवडे बाजारात गस्तकामी सहा . पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शन खालील पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे , पो .हवा / कैलास महाजन , पोलीस नाईक योगेश शिंदे , देवीदास पानसरे , संजय देशमुख पोलीस कॉन्टेबल प्रदिप आजगे , भगवान सोनवणे , सागर आरोटे , सुजय बारगळ असे लासलगाव शहरामध्ये आठवडा बाजार रविवारी गस्त करत असतांना एक इसम आठवडा बाजारातील लोकांना संशियत वावरतांना मिळुन आल्याने त्यांस पोलीस ठाणेस घेवुन त्यास नावगाव विचारता त्याने त्यांचे नाव सुरजकुमार अर्जुन माहातो वय . २४ वर्ष , मु . महाराजपुर , पोस्ट.कलयाणी ता . तालझरी , जि . साहेबगंज राज्य . झारखंड , असे सांगितले त्याचेकडे सखोल चौकशी करता त्याने त्याचा साथीदार नामे कुणाल कुमार रामरतन महातो , वय १ ९ वर्ष , रा . महाराजपुर बाजार , ता . कलयानी , जि . साहेबगंज , राज्य झारखंड , व इतर दोन अल्पवयीन साथीदार यांचे वतीने नाशिक , औरंगाबाद , अहमदनगर जिल्हयातील आठवडाबाजारातुन मोबाईल चोरी केलीबाबत कबुली दिली असुन त्यांचेकडुन सुमारे ३,३१,००० रु किमंतीचे २४ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले   आहे.   खंडु बाबुराव वाळके , रा . पिंपळद वाळकेवाडी , ता . चांदवड , जि . नाशिक यांचे फिर्यादी वरुन लासलगाव पोलीस ठाणे भादवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक २५-०९ -२०२२ रोजी गुन्हा दाखल असुन आरोपीस मा न्यायालय निफाड येथे हजर केले असता दिनांक ०१.१०.२०२२ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असुन गुन्हाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे , पोकॉ भगवान सोनवणे हे करत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!