ताज्या घडामोडी

गुरुपौर्णिमा निमित्त जनकल्याण सेवा समिती तर्फे शालेय साहित्य वाटप

गुरुपौर्णिमा निमित्त जनकल्याण सेवा समिती तर्फे शालेय साहित्य वाटप
सचिन वखारे, येवला.प्रतीनीधी
(येवला) गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून येवला येथील लक्कडकोट येथील जि. प. प्राथमिक शाळेत गरजु ४५ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास, पेन, पेन्सिल, खोडरबर, मिठाई व फळे असे अनेक साहित्य वाटप करण्यात आले.

स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे. अन्नदानामुळे एक वेळेची भुक भागू शकते पण विद्यादानाने अनेक विद्वान पंडीत तयार होतात. ते अनेकांना मार्गदर्शन करुन संपूर्ण विश्वाला दिशा दाखवू शकतात. माणसाला समृध्द करण्याकरीता शिक्षणच उपयोगी पडते, त्यामुळेच जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे व समितीचे सर्व सदस्य गेल्या २१ वर्षांपासून दरवर्षी विविध शाळेंना भेट देवून ‘जेथे कमी तेथे आम्ही’ ही भूमिका घेत अनेक गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करीत असतात. गरीब परीस्थितीमुळे शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये या उदात्त हेतूने व तळमळीने समितीचे सर्व सदस्य कार्य करीत असतात.

शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी मामांनी अनेक विनोदी चुटकुले व बोधप्रद कथा विद्यार्थ्यांना सांगून मनसोक्त हसविले. साहित्य मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता.

अध्यक्षस्थानी श्री. सुदाम दाणे साहेब होते तसेच समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे, उपाध्यक्ष दिगंबर कुलकर्णी गुरु, किशोर कुमावत, सुरजमल करवा, मुकेश लचके, शशिकांत मालपुरे, कैलास बकरे, जयेश निरगुडे, बाळासाहेब देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक किरण जाधव सर, उपशिक्षिका श्रीमती जयश्री आग्रे, प्रणिता म्हस्के मॅडम, तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!