ताज्या घडामोडी

.एस.जी.एस.च्‍या विद्यार्थ्यांची पुण्यातील तायक्वांदो व कराटे स्पर्धेत ट्रॉफी, सुवर्ण व रजत पदकांना गवसणी.*

*एम.एस.जी.एस.च्‍या विद्यार्थ्यांची पुण्यातील तायक्वांदो व कराटे स्पर्धेत ट्रॉफी, सुवर्ण व रजत पदकांना गवसणी.*
मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कुल, अंदरसुल शाळेतील विद्यार्थ्यांनी खेड पुणे येथे झालेल्या तायक्वांदो व कराटे स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.या स्पर्धेत वेगवेगळ्या जिल्ह्यातील ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. एम.एस.जी.एस.च्या एकूण ५ विद्यार्थ्यांनी वयोगट – १९ मध्ये तायक्वांदो व कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सन्मानचिन्ह ट्रॉफी , २ सुवर्ण व ३ रजत पदक पटकावुन नाशिक जिल्ह्याचे नाव उंच केले.
विजेते विद्यार्थी खालील प्रमाणे…..
१.सार्थक नवनाथ थोरात- सुवर्ण पदक.
२.वेदांत शाम गायकवाड- सुवर्ण पदक
३.पियुष निलेश एंडाईत -रजत पदक.
४.सिद्धेश्वर किशोर फुलारे -रजत पदक.
५.अनुज सुरेश आहेर- रजत पदक.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे शिक्षक अविनाश बोडारे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, संचालक राजेंद्र गायकवाड, मयूर सोनवणे, जीवन गाडे, डॉ. भगिनाथ जाधव, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, संगीताताई सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान , प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, अमोल आहेर, अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अजीम पटेल, सचिन घोडके, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, सुनीता वडे, नीलिमा देशमुख, शोभा निकम, सुस्मिता देशमुख, आलिया खान, प्रतीक्षा चव्हाण, शर्मिला पवार, धनश्री काळंगे, निदा फारूकी आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!