ताज्या घडामोडी

महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये मआविम संस्थेचा मोठा वाटा

प्रतिनिधी : रोहित डवरी

दि 20/7/2023 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत स्थापित उन्नती लोकसंचलीत साधन केंद्र , पेठ वडगांव ची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेचे उदघाटन मा .पोलीस निरीक्षक तळेकर सर ,जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे सर माविम कोल्हापूर, मोहिते सर , इम्रान इनामदार ,सेल्स व्यवस्थापक,आय सी आय सी आय, अध्यक्षा इनरर्वील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज मनीषा जाधव मॅडम तसेच सचिव स्मिता राजेश खामकर , तसेच एड्स नियंत्रण पथक या विभागामधील सनियंत्रन अधिकारी शिल्पा अष्टेकर मॅडम , CPR चे समुपदेशक मकरंद चौधरी सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यानंतर मविमच्या प्रार्थना घेऊन सभेची सुरवात केली , तसेच पाहुण्यांचे स्वागत केले.सर्व मान्यवरांचे पर्यावरण पूरक रोप देवून देऊन सत्कार करण्यात आला यानंतर अहवाल प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उन्नती पेठ वडगांव सी एम आर सी च्या अहवाल वाचन उपाध्यक्षा शुभांगी घाटगे मॅडम यांनी केले यानंतर व्यवस्थापक अमृता पाटील यांनी सन 22-23 याआर्थिक वर्षात झालेल्या कामाची माहिती देण्यात आली यामध्ये बचत गट स्थापन, बँक लिंकेज,गारमेंट युनिट, शेळीपालन FPC , माविम मित्र मंडळ, सकस आहार तसेच विविध सामाजिक उपक्रम, नवतेजस्विनी प्रकल्पाचा महिलांनी जास्तीत जास्त फायदा करून घेणे बाबत आव्हान केले.
यानंतर उपस्थिती मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलीत तळेकर सर , PI पेठवडगाव यांनी विविध कलमाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले यामध्ये सद्यस्थितीत समाजातील बदलत्या परिस्थिती ची जाणीव करून दिली ,दररोज पोलीस स्टेशनमध्ये महिला,मुली याच्यावर होत असलेल्या अत्याचार बाबत तक्रार येते त्यामुळे महिला व मुली याना संरक्षण मिळणे गरजेचे आहे तसेच आपणही समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे सांगितले .
यानंतर सागर मोहिते सर यांनी आय सी आय सी आय बँकेच्या मार्फत बचत गटातील महिलांना आवश्यक व वेळेवर कर्ज दिले जात आहे यामध्ये कर्ज कमीत कमी दीड लाख व जास्तीत जास्त 20 लाख पर्यंत दिले जात आहे , महिलंनी उद्योग व व्यवसायासाठी वापरावे असे सांगितले.
अध्यक्षा इनरर्वील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज मनीषा जाधव मॅडम तसेच सचिव स्मिता राजेश खामकर मॅडम यांनी महिलांसाठी विविध उद्योग व्यवसाय करणेबाबत खूप छान मार्गदर्शन केले.
जिल्हा समन्वय अधिकारी यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सुरवातीला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या शुभेच्छा दिल्यानंतर म्हणाले आजरोजी बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन उभे राहिले आहे माविम कोल्हापूर अंतर्गत उन्नती पेठ वडगांव अंतर्गत 12 गावात बचत गट स्थापन करण्यात आले आहेत याबचत गटांना विविध बँके मार्फत कर्ज मिळवून दिले जात आहे या कर्जातून महिलांनी अनेकविध प्रकारचे छोटे छोटे उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत यामध्ये , लोणचे, , किराणा दुकान, लोणचे पापड इत्यादी महिलांनी व्यवसाय सुरू न करता स्वतःचा ब्रॅण्ड तयार केला आहे त्यामुळे मालाची जास्तीत जास्त विक्री होवून नफा मोठया प्रमाणात मिळवता येईल
विविध शासकीय यंत्रणा सोबत समन्वय साधून उपक्रम घेतले जातात ,गावात माविम मित्र मंडळाची स्थापना करून बचत गटातील महिलांना सहकार्य व मार्गदर्शन केले जाते तसेच पुरुष सन्मान कार्यक्रम घेण्यात आला आहे तसेच सकस आहार च्या माध्यमातून महिलांनी सकस व आरोग्यासाठी आवश्यक आहार घ्यावा असे सांगितले .तसेच भा दोले मधील garment युनिट महिला शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) याबाबत सविस्तर माहिती दिली.
सदर सभेत बचत गटांतील महिलांच्या मुलांनी यश मिळविले आहे ,उद्योगजक त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच high linkage गटांचे सत्कार घेण्यात आले. तसेच सी एम आर सी सचिव मुक्ता डवरी मॅडम यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले .
शेवटी उपस्थित सर्वांचे आभार लेखापाल किरण शिंगे यांनी मानून सभा संपली असे अध्यक्षाच्या परवानगीने जाहीर केले.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक तळेकर सर ,जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे सर माविम कोल्हापूर, मोहिते सर , इम्रान इनामदार ,सेल्स व्यवस्थापक,आय सी आय सी आय, अध्यक्षा इनरर्वील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज मनीषा जाधव मॅडम तसेच सचिव स्मिता राजेश खामकर , तसेच एड्स नियंत्रण पथक या विभागामधील सनियंत्रन अधिकारी शिल्पा अष्टेकर मॅडम , CPR चे समुपदेशक मकरंद चौधरी सर
मा कोल्हापूर ,जिल्हा स्टाफ,तसेच मावीम मित्र मंडळ सी एम आर सी कार्यकारणी, व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी, CRP ,बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!