ताज्या घडामोडी

नविन नाशिक दत्तधाम चौक मित्र मंडळ प्रणित ए.एन.फाउंडेशन गणेश उत्सव मंडळास मंत्री छगन भुजबळ यांची भेट ,

नविन नाशिक दत्तधाम चौक मित्र मंडळ प्रणित ए.एन.फाउंडेशन गणेश उत्सव मंडळास मंत्री छगन भुजबळ यांची भेट ,

गणरायाची विधिवत पध्दतीने केली पुजा-आरती

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-: शहरासह नविन नाशिक परिसरात वरूणराजाच्या हजेरीत महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगनरावजी भुजबळ यांनी काल संध्याकाळी ८ वाजता दत्तधाम चौक सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळ प्रणित ए.एन फाउंडेशन,नाईक नगर येथील मंडळास गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट देत गणरायाचे विधिवत दर्शन घेतले.यावेळी श्री नामदार छगनराव भुजबळ यांच्यावतीने नाशिकचे माजी खासदार श्री.समीर भुजबळ यांनी दत्तधाम चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अमोल नाईक व नविन नाशिकच्या विशेष कार्यकारी अधिकारी सौ.कविता नाईक यांनी गणेशोत्सवाचे अतिशय सुंदर असे नियोजन केल्याने कौतुक केले.यावेळी श्री.समीर भुजबळ यांनी उपस्थित नागरिकांना शुभेच्छा देत शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान केले.

यावेळी गणरायाच्या आरतीचा मान अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ यांना देण्यात आला.सद्यस्थितीत सर्वच ठिकाणी गणेशोत्सव सुरू आहे.परंतु पोलिस प्रशासन कर्तव्य बजावत असतांना त्यांना अनेकदा सण-उत्सव साजरे करणं फार कमी होत असल्याने त्याचाच एक भाग म्हणून दत्तधाम चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अमोल नाईक व सौ.कविता नाईक यांनी अंबड पोलिस प्रशासनास आरतीचा मान देण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दत्तधाम मित्र मंडळाने आरोग्य शिबिरं, नेत्रचिकित्सा शिबिरं,चष्मा शिबिरं,गरीब रुग्णांना मदत,रक्तदान शिबिरं यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,पुस्तकं-वह्या वाटप,क्रीडा स्पर्धा,महिलांसाठी शिलाई मशीनचं वाटप त्याचप्रमाणे पूरग्रस्तांना,आपघातग्रस्तांना मदत यासारखे समाजोपयोगी उपक्रम-कार्यक्रम मंडळातर्फे यशस्वीपणे राबवले जातात.आजही मंडळाची उल्लेखनीय वाटचाल अधिक जोमाने सुरू आहे.मंडळातर्फे गणरायाच्या देखाव्याचा, सजावटीचा उपयोग समाजप्रबोधनासाठी केला जावा यासाठी मंडळाचे अध्यक्ष अमोल नाईक अग्रेसर असतात.दत्तधाम चौक मित्रमंडळाचे कार्यकर्ते पक्षभेद विसरून मंडळाचे विविध कार्यक्रम-उपक्रम यशस्वी करण्यासाठी झटतांना दिसून आले.

दत्तधाम चौक सांस्कृतिक कला व क्रीडा मित्रमंडळ प्रणित ए.एन.फाउंडेशन नाईकनगर मित्रमंडळ यंदा सहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे.अण्णा नाईक यांनी सामाजिक कार्याच्या दृष्टीने मंडळाची स्थापना केली होती.यंदा खास ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये भक्तिगीतांसह गणरायाच्या विविध गीतांचे सादरीकरण करण्यात येत असल्याने गणेशभक्त मोठ्या संख्येंने गर्दी करत आहे.. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाईक दरवर्षी श्रावणी सोमवारनिमित्त महाप्रसादाचे नियोजन करतात.गणेशोत्सवात भक्तांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात आल्याने कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही,ह्या दिशेने मंडळाने हे पाऊल उचलले आहे.मंडळाकडून विविध सणांना गोरगरिबांसाठी अन्नधान्य वितरण करण्यात येते. तसेच शहरालगत असलेल्या विविध पाड्यांवर जाऊन रहिवाशांसाठी कपडे व वह्यांचे वाटपदेखील केले जाते.स्थानिक रहिवाशांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तर रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरदेखील आयोजित करण्यात येते.

मंडळाची वैशिष्ट्ये बघता भव्यदिव्य स्टेज,कोरोनाकाळात धान्यवाटप, दत्तजयंतीनिमित्त महाप्रसादाचे नियोजन,श्रावणी सोमवारनिमित्त खिचडी वाटप कार्यक्रमाचे नियोजन,नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे,गोरगरिबांसाठी कपडे व वह्यावाटप असे विविध कार्यक्रम दत्तधाम मित्रमंडळ रावबित असल्याने नेहमी चर्चेत असणार्‍या ह्या मंडळावर व आयोजकांवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतांना दिसून येतो.आज हे दत्तधाम चौक मित्र मंडळ सामाजिक बांधिलकी जपणारे म्हणून अग्रगण्य गणेशोत्सव मंडळ म्हणून सुपरिचित आहे.

याकार्यक्रमावेळी दत्तधाम चौक मित्र मंडळ प्रणित ए.एन फाउंडेशन,नाईक नगर,नवीन नाशिक,गणेश मंडळास महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार मा.श्री छगनरावजी भुजबळ व माजी खासदार श्री.समीरभाऊ भुजबळ यांच्या शुभहस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री नानासाहेब महाले, श्री दिलीप आण्णा खैरे,अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, श्री समाधान जेजुरकर,अंबड पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री नाहीद शेख,श्री योगेश शिरसाठ,श्री मकरंद नाना सोमवंशी, सरपंच श्री राजाभाऊ काकळीज,श्री संतोष भुजबळ ,श्री हरिश महाजन,श्री कुणाल बागडे उपस्थित होते.या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष अमोलभाऊ नाईक,सौ कविता नाईक,अध्यक्ष रोहित नाईक यांच्या वतीने नामदार मञी छगन भुजबळ व माजी खासदार श्री समीर भाऊ भुजबळ यांचे भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.याप्रसंगी परिसरातील नागरिक, हितचिंतक,माता-भगिनी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!