एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा.
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुलच्या इंचार्ज शिक्षिका माधुरी माळी या होत्या.कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मी बाई, इंदिरा गांधी, मातोश्री शांताबाई यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षि स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.
यानंतर शिक्षिका पुनम घोंगाने, सुनीता वडे, चेतना माकूने, सुस्मिता देशमुख, निलिमा देशमुख, स्मिता खैरनार, अर्चना एंडाईत, आरती राजपूत, राजश्री झांबरे, अनिता लाचुरे, शोभा निकम, धनश्री कळांगे, पूजा गायकवाड, निदा फारुकी, मोनिका कळांगे, मनीषा लहरे, तरंननुम सय्यद, रोहिणी पुंड, शुभांगी दारूंटे, पल्लवी वडे, प्रीती भालेराव, कल्याणी देशमुख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात माधुरी माळी यांनी स्त्रियांचे जागतिक योगदान व महान महिलांचे कार्य विशद केले.