ताज्या घडामोडी

रेबीजमुक्त शहर करण्याकरिता खास लंडनहून आलेली साडेसात कोटींची ऑपरेशन व्हॅन येवलाानगर परीषद कडे

https://youtu.be/Gv6XgO4j3Oo

दिनांक : 13/02/2022

नामदार माजी उप मुख्यमंञी छगण भुजबळ यांच्या पाठ पुराव्यास यश 

पोलीस टाईम्स न्युज च्या बातमी ची माजी उप मुख्य मंञी छगण भुजबळ यांनी घेतली दखल

https://youtu.be/Gv6XgO4j3Oo पुर्विची बातमी पोलीस टाईम्स न्युज २४

रेबीजमुक्त शहर करण्याकरिता खास लंडनहूणन आलेली साडेसात कोटींची ऑपरेशन व्हॅन शनिवार (दि. 11/02/2023) रोजी येवला शहरात दाखल झाली आहे. या मोहिमेत शहरातील श्वानांचे रेबीज लसीकरण व आवश्यकतेनुसार सर्जरी करण्यात येणार आहे. सदर मोहिमेचा शुभारंभ पशुवैद्यकीय दवाखाना पाटोदा रोड, येवला या ठिकाणी दि. 14 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता होणार आहे.

वर्ल्ड वाईड व्हेटर्नरी सर्व्हिस, येवला नगरपरिषद व पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय येवला यांचे संयुक्त विद्यमाने येवला शहर परिसरातील भटक्या व पाळीव श्वानांवर अॅण्टीरेबीज लस व आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

श्वानांवरील उपचारासाठी अद्ययावत साधनसामग्री आणि सुसज्ज ऑपरेशन थिएटर असलेल्या या वाहनाबरोबर असलेले स्वयंसेवक येवला शहरात ठिकठिकाणी रेबीज लसीकरण करणार आहेत.

ज्यांचे पाळीव श्वान आहेत त्यांनीदेखील आपल्या श्वानांवर मोफत उपचार व लसीकरण करवून

घेण्याचे व नगरपरिषदेकडे नोंदणी करण्याचे आवाहन नगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

उपचारासाठी जेथे हजारो रुपये लागतात, अशा शस्त्रक्रिया या व्हॅनमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मोफत केल्या जाणार आहेत. या अधिकाऱ्यांकडून संबंधितांना श्वानांच्या काळजीबाबतचे मोफत प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. तज्ञांमध्ये डॉ. श्री. सुमित के. एस. व श्री. प्रविण ओव्हळ यांचा समावेश आहे.

माजी उपमुख्यमंत्री मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांचे मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे. भुजबळ समर्थक श्री. मोहन बापु शेलार यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांची राहण्याची व जेवणाची सोय केली आहे.

पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय येवला येथील सहायक आयुक्त डॉ. बाळासाहेब होन व डॉ. सतिश कुऱ्हे यांचे सहकार्याने दवाखाना परिसरात अत्याधुनिक सुविधा असलेले वाहन लावण्यात तेथील सोयीसुविधांचाही सदर कार्यक्रमात वापर होणार आहे.

अधिक माहितीकरिता नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक श्री. सागर झावरे (संपर्क क्र. 9404977759) व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश कुन्हे (संपर्क क्र. 7588097147 ) यांचेशी संपर्क साधावा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!