ताज्या घडामोडी

आंतर महाविद्यालयीन केमियाड स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थिनींनी पटकावले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक.

आंतर महाविद्यालयीन केमियाड स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थिनींनी पटकावले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक.

पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार.8888509003📱

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाडच्या रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींच्या संघाने मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन केमियाड स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. रसायनशास्त्र विभागाचे डॉ. राहुल शिंदे व प्रा. रोहित शिंदे यांनी महाविद्यालयाच्या विजयी केमियाड संघाला ला उत्कृष्ट मार्गदर्शन केले. सदर स्पर्धा ही रसायनशास्त्र या विषयाची असुन या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण 16 महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यात मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वाती काकड (तृतीय वर्ष विज्ञान), मृणाल संसारे (द्वितीय वर्ष विज्ञान) व शुभांगी पाटील (प्रथम वर्ष विज्ञान) यांच्या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले.विजयी संघाला ट्रॉफी, सर्टिफिकेट्स व रोख बक्षीसे देण्यात आले. या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. एल. शेंडगे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी एस देसले, कुलसचिव श्री समाधान केदारे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले. जेएटी महाविद्यालय मालेगाव व येवला महाविद्यालय यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!