ताज्या घडामोडी

येवला | श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्था यांचे तर्फे शहरातील इयत्ता दहावी व बारावीच्या प्रथम तिन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

येवला | श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्था यांचे तर्फे शहरातील इयत्ता दहावी व बारावीच्या प्रथम तिन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यांत आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राठी ट्रस्टचे प्रमुख किशोर राठी हे उपस्थित होते.लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्थेद्वारे दरवर्षी हा सत्कार समारंभ आयोजितकरण्यात येतो. सदरचा सत्कार
समारंभ जनता विद्यालयाच्या
प्रांगणात पार पडला. सत्काराचे
स्वरुप प्रथम क्रमांकास रोख
स्वरुपात रु.१५००, द्वितीयक्रमांकास रु. १००० तर तृतिय क्रमांकास रु.८०० तसेच आकर्षक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे होते. जनता विद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब मामुडे, यांनीआपले मनोगत व्यक्त करून किशोर राठी, अशोकराव देशपांडे, श्रीकांत पारेख, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचा सत्कार केला. याप्रसंगी चंद्रशेखर जोशी, उपप्राचार्य राजेंद्र मार्तंड पर्यवेक्षक मच्छिंद सोनवणे, शैलेश लाड, आदीसह विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. राजश्री फडके यांनी सुत्रसंचलन तर प्रभाकर झळके यांनी आभार व्यक्त केले.
साठी सचिन वखारे, येवला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!