ताज्या घडामोडी

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले
.

प्रतिनिधी :कुणाल काटे कोल्हापुर

तळेगाव MIDC पो स्टे हद्दीत एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे मराठी सिने अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी (वय 77 वर्षे) हे बंद फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत मिळून आले आहेत. ते गेले 7- 8 महिन्यापासून वरील ठिकाणी एकटेच राहण्यास होते. त्यांचा मृत्यू 2-3 दिवसांपूर्वी झालेला असावा. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा गश्मिर यांना कळविण्यात आली असून, ते उद्या तळेगाव येथे आल्यानंतर मृतदेहाचे पोस्ट मोर्टेम करण्यात येणार आहे.
मराठीतील एव्हरग्रीन हीरो म्हणून परिचित असणारे महाजनी यांनी अनेक मराठी चित्रपट गाजवले.
‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे अनेक यशस्वी चित्रपट महाजनी यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!