ताज्या घडामोडी

तिहेरी अपघातात कॉलेज विद्यार्थी गंभीर जखमी, कुटुंबाची बिकट परिस्थिती, मदतीला सरसावले मित्र….

तिहेरी अपघातात कॉलेज विद्यार्थी गंभीर जखमी,
कुटुंबाची बिकट परिस्थिती, मदतीला सरसावले मित्र….

सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी

शहरातुन मदत फेरी काढून भागवला जाताेय दवाखन्याचा खर्च….!

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पाच ते सहा दिवसांपूर्वी तिहेरी अपघात झाला होता.
या अपघातात एक महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे,
मात्र त्याच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचे सर्व मित्र एकवटून बीड शहरात मदतीचा हात मागताना दिसत आहेत.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात काही दिवसांपूर्वी एक तिहेरी अपघात झाला होता.
या अपघातात प्रशांत रमेश राऊत नावाचा विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाला आहे.
केज तालुक्यातील असलेल्या या तरुणाचं शिक्षण गडी येथील एका कॉलेजमध्ये सुरु होतं.
मुलाच्या अपघाताचं वृत्त समजल्यानंतर आई-वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत असलेल्या दाम्पत्याने मुलाच्या शिक्षणासाठी पत्नीच्या अंगावरील दागिने विकून मुलाला अॅडमिशन घेऊन दिली.
मात्र त्याच मुलाचा दुर्दैवी अपघात झाल्याने कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे.
प्रशांत सध्या बीड येथील काकू नाना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
या उपचारांसाठी जवळपास पाच लाखांहून अधिक खर्च लागणार आहे.
अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबाचा एकमेव आधार प्रशांत आहे.
आता तोच मरणाच्या दारात असल्याने बायकोचं मंगळसूत्र विकण्याची वेळ रमेश राऊत यांच्यावर आली आहे.
या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत प्रशांतच्या मित्रांनी एकवटून त्याच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.
सकाळपासून बीड शहरात मदतीचा हात मागण्यासाठी फिरत आहेत.
फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्याला मदत केली जात आहे, मात्र यावेळेस गहिवरलेल्या मित्रांनी इतर नागरिकांना देखील आपल्या मित्राला मदत करण्यासाठी आवाहन केले आहेमे.
डिकल आणि दवाखान्याचा खर्च पेलू न शकणारी प्रशांतच्या कुटुंबीयांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे.
यासाठी मित्रांनी उचललेलं पाऊल हे खरंच कौतुकास्पद असल्याचं नागरिक म्हणत आहेत.

संकटावर मात करण्यासाठी प्रशांत राऊतच्या मित्रांनी उचललेलं पाऊल पाहून अनेकांचे मन गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही.
आमच्या मित्राला वाचवण्यासाठी जी आर्थिक मदत आपल्याला शक्य आहे
ती काकू नाना हॉस्पिटलमध्ये येऊन करावी,
आमच्या मित्राची परिस्थिती पाहून आपल्या पद्धतीने मदत करावी असे आवाहन प्रशांतच्या मित्रांनी जनतेला केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!