ताज्या घडामोडी

प्रजासत्ताक दिनानिमित्त डी पॉल स्कूलमध्ये चित्ररथाद्वारे महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक परंपरेचे मनोहरी प्रदर्शन

प्रतिनिधी सचीन वखारे

प्रजासत्ताक दिनानिमित्त डी पॉल स्कूलमध्ये चित्ररथाद्वारे महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक परंपरेचे मनोहरी प्रदर्शन

येवला:
येथील डिपॉल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फादर जीमिल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.कार्यक्रमाला सिस्टर मेरी, सिस्टर सालीयन, ब्रदर सीबीन,शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅथ्यू, उपमुख्याध्यापक फादर ऑगस्टिन, सिस्टर हेमिमा,सिस्टर दीपिका, सिस्टर जोजी, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रार्थना नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्रीडा शिक्षक सागर रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करत ध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर प्रथमच विद्यालयामध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रदर्शन उत्कृष्ट अशा चित्ररथांद्वारे करण्यात आले. शाळेमध्ये चार हाऊस मध्ये चित्ररथांचे प्रदर्शन व नृत्याची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी चढाओढ करत आपले नैपुण्य दाखवले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित उत्कृष्ट नाटक सादर केले आणि संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. मुख्याध्यापक फादर मॅथ्यू यांनी संविधानाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना त्याचे पालन करण्यास सांगितले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आपल्या हिंदी, इंग्रजी व मराठी भाषणांद्वारे सांगितले.कार्यक्रमाचे संयोजन स्मिता देशमुख ,मनीषा कोटमे, रश्मी वर्मा, जयश्री साळवे, आनंद सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सूत्र संचालन केले व काव्या कंकरेज हिने आभार प्रदर्शन मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!