ताज्या घडामोडी

येवल्यात निवडणूक कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट प्रदान*

*येवल्यात निवडणूक कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट प्रदान*

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20, दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत 119 येवला मतदार संघातील निवडणुक कर्तव्यार्थ आदेशित निवडणूक कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मतदान करता यावे, कर्मचारी मतदान हक्कापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सदर कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या निवडणूक प्रशिक्षणाच्या वेळी फॉर्म नंबर बारा अ चे वाटप करून ते फॉर्म विहित नमुन्यात भरून घेतले होते.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवडणूक कर्मचाऱ्यांना दिनांक 25 एप्रिल ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये येवला विधानसभा मतदार संघातील 603 कर्मचाऱ्यांना तसेच नांदगाव,निफाड, कळवण चांदवड आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघातील 206 कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.

सदर प्रमाणपत्र वाटपासाठी शिक्षकांचे केंद्रनिहाय नियोजन व मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी केले.सदर प्रमाणपत्राचे वाटप करण्यासाठी नायब तहसीलदार नितीन बाहीकर,हिरा हिरे, पंकज मगर, अव्वल कारकून सोमनाथ शिंदे,मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर पगार,लिपिक उषा गोंटे, तलाठी मनीषा इगदे,अश्विनी भोसले,शुभम पाटसकर, पुरुषोत्तम निकम,रीमा भागवत,गणेश अवचार, बिएलओ समन्वयक रवींद्र शेळके,स्वीप सदस्य दत्तात्रय उगले,अमित कलगुंडे,शिपाई कर्मचारी गंगाधर ठोंबरे, किरण पठारे यांनी विशेष प्रयत्न व मेहनत घेतली.

*काय आहे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट*

*लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगवेगळ्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामे नियुक्त केले जातात. अशा कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कर्तव्यावेळी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी माननीय निवडणूक आयोगाने संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांना त्याच मतदान केंद्रात मतदान करण्याची सोय केलेली असते. यासाठी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी त्याच लोकसभा मतदारसंघातील असावा . यामुळे अधिकारी/कर्मचारी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहत नाहीत. आणि मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होते.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!