ताज्या घडामोडी

मुंबई आग्रा हायवे वरील हॉटेल ग्रीन व्हॅली समोर बस व मोटरसायकल अपघातात तेवीस वर्षाची महिला मृत्युमुखी.*

*मुंबई आग्रा हायवे वरील हॉटेल ग्रीन व्हॅली समोर बस व मोटरसायकल अपघातात तेवीस वर्षाची महिला मृत्युमुखी.*
पोलिस टाईम्स न्युज / सुनिलआण्णा सोनवणे

*चांदवड* : मुंबई आग्रा हायवे वरील चांदवड शिवारात हॉटेल ग्रीन व्हॅली समोर चांदवड कडून मालेगाव कडे जाणाऱ्या बाजूने अज्ञात एसटी बसने भरगाव वेगाने मोटरसायकलला धडक दिल्याने सोनाली राम कुंभार्डे (राहणार: टाकळी, लासलगाव) वय 23 वर्ष या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सदर महिलेचे चुलते संतोष काशिनाथ जाधव राहणार कळमदरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

त्याचप्रमाणे महिलेच्या दोन वर्षे बालकाला डोक्यात मार लागुन जखमी झाल्याने त्यास सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चांदवड या ठिकाणी दाखल करण्यात आले असून बालकाची तब्येत सुधारत असल्याची माहिती मिळत आहे.

सदरचा अपघात हा इतका भयंकर होता की त्यात महिला जागीच मृत झाली आहे. दोन वर्ष वयाच्या बालकाच्या डोक्यात मार लागला असून मोटरसायकल स्वार सुद्धा जखमी झाला आहे.
एसटी बस चालकाच्या अत्यंत निर्दयपणे, बेफिकीर, भरगाव वेगाने बस चालवल्यामुळे सदरचा अपघात झाला असून अपघाताची खबर न देताच व जखमींना मदत न करता निर्दयी बस चालकाने आपल्या ताब्यातील बस घेऊन पळून गेला आहे. या अज्ञात बस व बसचालकाचा शोध चांदवड पोलीस स्टेशन करत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!