ताज्या घडामोडी

अधिकारी गोड गोड बोलुन वाटी लावतात अण,नागरिक चपलांचा हार घालत असतात,महावितरण ला ईशारा…

*!!! संडे स्पेशल दणका मोडला महावितरणच्या नाठाळ आणि उर्मट अधिकाऱ्यांचा मणका !!!*

*शेवगांव शहरात विजेचा खेळ खंडोबा जुन्या भागात दुरुस्तीच्या नावाखाली अर्धे शेवगांव कायम अंधारात अधिकारी आणि कार्मचारी फोन घेत नाही कार्यालया चा दूरध्वनी कायम नादुरुस्त*

{ अविनाश देशमुख शेवगांव }
*शेवगांव शारतील जुन्या भागातील खंडोबानगर धनगर गल्ली नाईकवाडी मोहल्ला मारवाड गल्ली जैन गल्ली खालची वेस भारदे गल्ली माळी गल्ली पैठण रोड दर दोन तासाला वीजपुरवठा खंडित होतो आणि तो तासंनतास गायब असतो कण्ट्रोल ला फोन केल्यास कामं चालु आहे सबस्टेशन ला फॉल्ट आहे मेन लाईन ला प्रॉब्लेम आहे अशी मोघम उत्तरे दिली जातात कायम नादुरुस्त लाईन असते एक कामं दोनदा आणि ताकात पाणी तीनदा वायरमन लोक हि फोन उचलत नाहीत* याना एकदा अत्यावश्यक सेवा म्हणजे काय हे एकदा नीट समजुन सांगावे लागेल

*ताजा कलम*

*ज्या कामात मलिदा आहे ती कामे तत्परतेने केली जातात काही बिल्डर लोकांच्या प्लॉटिंगवर तिथे नागरी वस्ती नसताना लाईन अपटुडेट करण्याचे कामं काही महाभागांनी करून ठेवले आहे जिथे लोक गेल्या सत्तर वर्षांपासुन राहतात तिथे फॉल्ट शोधायला आणि मेंटेनन्स करायला वेळ नाही “जिथे नाही मणी कामं करीना कोणी” अशी अवस्था झाली आहे*

*क्रमशः*

*नागरिक तक्रार घेऊन कार्यलयात गेल्यास संबंधित अधिकारी गोड गोड बोलुन वाटी लावतात आणि त्यांना पाहिजे तेच करतात मागे एक ठेकेदार चांगलाच नडला होता साहेबांची पार तोतरी वळली होती कारभार सुधारा नाहीतर शेवगांव चे नागरिक चपलांचा हार घालत असतात हा शेवगावचं इतिहास आहे*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!