ताज्या घडामोडी

कुंभोजमध्ये उद्या रंगणार कुस्त्यांचे जंगी मैदान

कुंभोजमध्ये उद्या रंगणार कुस्त्यांचे जंगी मैदान

पत्रकार राहुल घोलप
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री बिरदेव तालीम मंडळ व श्री बिरदेव तरुण मंडळाच्या वतीने सोमवार (दि.१७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता श्री.हिवरखान – बिरदेव मंदिर परिसरात कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती पै.बाळू अपराध ( डिग्रज) विरुद्ध पै.मनीषकुमार (हरियाणा), द्वितीय क्रमांकाची कुस्ती पै. विश्वजीत रुपनर (खंडेराजुरी) विरुद्ध हितेशकुमार (अहमदाबाद) , तृतीय क्रमांकाची कुस्ती पै.श्रेया केसकर ( दानोळी ) विरुद्ध पै.श्रृती माने ( शिरोळ ) यांच्यात होईल तसेच मैदानात इतर लहान मोठ्या सुमारे सव्वाशे कुस्त्या होणार आहेत.
मैदानावर गटनेते किरण माळी, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, मा.जि.प.अध्यक्ष डी.सी.पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, शरद कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, मा.जि.प.सदस्य प्रवीण यादव, मा.जि.प.सदस्य अशोकराव माने, सरपंच जयश्री जाधव, उपसरपंच अनिकेत चौगुले, ॲड.अमित साजणकर, ग्रा.पं.सदस्य अजित देवमोरे, ॲड.अमर घोरपडे, शिवाजी घोरपडे, मा.पं.स.सदस्य संतोष माळी, मा.पं.स.सदस्या सपना पांडव, संदीप कारंडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित राहणार आहेत ,,,

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!