ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी रस्ता दर्जावर लक्ष द्या मिरज सुधार समितीने जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाब

प्रतिनिधी मुज्जफर काझी
मिरज

छत्रपती शिवाजी रस्ता दर्जावर लक्ष द्या
मिरज सुधार समितीने जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाब

मिरज शहरातील बहूचर्चित छत्रपती शिवाजी महाराज भूसंपादनमुळे आणि झालेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट होत आहे. किरकोळ स्वरूपाच्या पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. केवळ बैठकांवरच जोर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी , महापालिका आयुक्त सुनील पवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस उपाधीक्षक प्रवीण गिलडा यांच्यासह विविध विभागाचे अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्तासह इतर रस्त्याची पाहणी केली. यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, कार्यवाह जहीर मुजावर, महिला अध्यक्ष सौ. गीतांजली पाटील, अक्षय वाघमारे, संतोष जेडगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाहणी वेळीच जिल्हाधिकारी डॉ. राजा वर्धन यांना गाठले. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी काही ठिकाणी जमीन भूसंपादन करावी लागणार आहे. मिळकत नुकसान भरपाई बाबत ठोस निर्णय होत नाही. सुरू असलेल्या रस्त्याच्या दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने अवघ्या किरकोळ पावसातच अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेतल्या जातात मात्र रस्त्याची अवस्था दयनीयच आहे. याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी मिरज सुधार समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत लवकरच मिरज सुधार समिती सोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी मिरज सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!