ताज्या घडामोडी

गावठी कट्ट्यासह आरोपी गजाआड.

जळगाव
गावठी कट्ट्यासह आरोपी गजाआड.

आज दिनांक 10/08/2023 रोजी सकाळी 10.30 वा चे जळगाव एमआयडीसी परीसराम मध्ये असलेल्या ही सेक्टर प्रभा पॉलीमर जवळ आकाश प्रेम तंवर रा कुसुंबा याचा मित्र बव्या उर्फ संतोष कोळी रा कुसूंबा याने स्वप्नील उर्फ सोपान चंदुसिंग मोरे रा. गजानन पार्क कुटूंबा याला काही दिवसापूर्वी मारले होते या कारणावरुन स्वप्नील याने आकाश तंवर यास गावठी कट्ट काढुन त्यातून दोन गोळया फायर करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. व तो फायरींग करुन त्याचे मित्र अजय पाटील व विपुल पाटील यांचेसह मी सा ने पळून गेला होता. म्हणुन सदर बाबतीत आकाश प्रेम तंबर रा कुसुंबा याने दिलेल्या फिर्यादी वरुन एमआयडीसी पोस्टे ला जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणेबाबत गुरनं. 580/2023 भादवी कलम 307, 504 34 आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर एमआयडीसी परीसरात दिवसा फायरींग झाल्यामुळे व सदरचा गुन्हा गंभीर असल्यामुळे सदर ठिकाणी मा. अपर पोलीस अधीक्षक सो. चंद्रकांत गवळी सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत सो. यांनी घटनास्थळी भेट देत आरोपी पकडणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सदर गुन्हयाचा तपास सुरु होता. यादरम्यान मा. पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांना मिळाली की. सदर फायर करणारा स्वप्नील हा मन्यारखेडा येथे आहे बाबतची माहीती मिळाल्यावर लागलीच मन्यारखेडा येथे गुन्हे शोध पथकाचे पोउनी दिपक जगदाळे, सफो. अतुल वंजारी, पोना. सुधीर सावळे, इमरान सैय्यद, सचीन मुंढे, योगेश बारी, किशोर पाटील, सचीन पाटील, मुदतसर काझी मुकेश पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंढे, महीला पो ना निलोफर सैय्यद, अशांनी जावून त्याला मन्यारखेडा फाट्याजवळून तब्यात घेतले आहे. त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले असून व त्याचे अंगझतीमधे त्याने गुन्हयात वापरलेले 20,000/- रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा आणी एक जिवंत काडतुस काढुन दिलेले आहे. त्याला अटक करण्यात आली उदया त्याला मा. न्यायालयात हजर करण्यात येणार असुन गुन्हयाचा तपास पोउनी दिपक जगदाळे, योगेश बारी हे करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!