ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….* *येवला मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….*

*येवला मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर*

*नाशिक,येवला,दि.२५ऑगस्ट :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी येवल्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व नव बौध्द घटकांच्या वस्त्यांना अधिक मुलभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.

राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा व गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबिवण्यात येते. या योजनेतून मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील विविध गावांमध्ये एकूण ५ कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहे.

यामध्ये येवला शहरातील प्रभाग क्र. १२ दलित वस्ती मधील भिमालया जवळ बहुउद्देशीय सभागृह आणि अभ्यासिकेचे बांधकाम करण्यासाठी ७० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये संविधान सभागृह, बल्हेगाव येथील अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये संविधान सभागृह, अंगणगाव येथील अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये संविधान सभागृह बांधण्यासाठी प्रत्येकी २० लक्ष, पिंपळगाव जलाल, ममदापूर व अंगुलगाव येथील अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये व्यायामशाळा बांधण्यासाठी प्रत्येकी १५ लक्ष, अंदरसूल व धामणगाव येथील मातंग समाज वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येकी १२ लक्ष ५० हजार, अंदरसुल येथील आण्णाभाऊ साठे नगर मध्ये सांस्कृतिक सभागृह, रोहिदास नगर मध्ये सभामंडप बांधण्यासाठी प्रत्येकी १५ लक्ष, धानोरे व पन्हाळसाठे ता.येवला येथील येथील मातंग समाज वस्तीमध्ये संविधान सभागृह बांधण्यासाठी प्रत्येकी १५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच निफाड तालुक्यातील शिरवाडे, कोळगाव, दिंडोरी तास, देवगाव, गोंदेगाव, खेडलेझुंगे, ब्राम्हणगाव विंचूर, वाहेगाव, मानोरी खु. गाजरवाडी, नांदगाव कानळद येथील अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये संविधान सभागृह बांधण्यासाठी प्रत्येकी २० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामांना सुरुवात होऊन नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!