ताज्या घडामोडी

तांबापुरात तरुणाला तिघांकडुन मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तांबापुरात तरुणाला तिघांकडुन
मारहाण;
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात नाथ गल्ली येथे लहान मुलांच्या भांडण्याच्या कारणावरून तरुणाला तीन जणांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना रवीवारी २९ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता तांबापूरा येथे घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आकाश प्रकाश चव्हाण, रा. डी.मार्ट जवळ तांबापुरा जळगाव, हा तरुण आपल्या परिवारास राहिला आहे. रविवारी २९ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता लहान मुलांच्या भांडण्याच्या कारणावरून आकाश चव्हाण याला अरबाज तडवी, अमन अरबाज तडवी, आणि युनूस अरबाज तडवी, तिघे रा. तांबापुरा जळगाव, यांनी नाथ गल्लीत हातातील कडे आकाशला मारुन दुखापत केली तसेच जीव ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर आकाशच्या भाऊ रवी प्रकाश चव्हाण, याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अरबाज तडवी, अमन अरबाज तडवी, आणि युनूस अरबाज तडवी, या तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!