ताज्या घडामोडी

शहरातील डावखर नगर या ठिकाणाहून निघाली आषाढी एकादशीनिमित्त दिंडी*

*शहरातील डावखर नगर या ठिकाणाहून निघाली आषाढी एकादशीनिमित्त दिंडी*
पोलीस टाईम्स न्युज/सुनिलआण्णा सोनवणे

*चांदवड* : बोलावा विठ्ठल… पहावा विठ्ठल…. करावा विठ्ठल जीवेभावे….
आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने डावखर नगर येथे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी मिरवणुकीने विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडी संपूर्ण डावखर नगर मध्ये मिळवण्यात आली.

यावेळी माता भगिनींनी या दिंडीसाठी रस्त्यात आपापल्या घरासमोर रांगोळी काढून विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पूजन केले सदरच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण डावखरनगर मधील महिला पुरुष मंडळी व बालगोपाळांनी सहभाग नोंदवून प्रत्यक्ष रिंगण सोहळा व महिलांनी फुगड्या खेळून आनंद साजरा केला.

यावेळी भागवताचार्य सीमाताई काळे, ह भ प बाळासाहेब काबाडे, रमेश काळे, दत्तात्रय गलांडे, राजेंद्र काळे, नामदेव पवार, प्रकाश जाधव, प्रमोद काळे, माळी सर, रवींद्र कोतवाल, बाळा पवार, राजेंद्र नलगे यांच्यासह डावकर नगर मधील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!