ताज्या घडामोडी

खोची येथे निवासी कुस्ती प्रशिक्षण शिबीर संपन्न*

*खोची येथे निवासी कुस्ती प्रशिक्षण शिबीर संपन्न*

प्रतिनिधी: रोहित डवरी

खोची. ता. हातकणंगले येथे 10 मे ते 20 मे या कालावधीत निवासी कुस्ती प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले..नवोदित मल्लांना शिबिराद्वारे प्रोत्साहन व मार्गदर्शन करून त्यांचा शारीरिक ,मानसिक,बौद्धिक विकास व्हावा हाच उद्देश ठेऊन या शिबीराचे आयोजन करण्यात आले.यात 30 शिबिरार्थी सहभागी झाले.शिबीर कालावधीत शारीरिक व्यायाम,ट्रेकिंग,स्विमिंग,कुस्तीतील नवीन डावांचे सराव घेण्यात आले.दहा दिवसांच्या या शिबिरात मुख्य प्रशिक्षक म्हणून पै.सतीश पाटील यांनी पैलवानांना कुस्तीतील नवनवीन तंत्राची ओळख करून दिली. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास,शारीरिक जडणघडण,कुस्तीतील नवीन तंत्र या विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.मा.विकी आयवळे, विश्वास खाडे सर,अभिजित गुरव सर,अर्जुन बाबर,डॉ.नरेंद्र पाटील,पै अमोल साठे सर इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.जय हनुमान तालमीकडून या शिबीराचे नेटके नियोजन केले गेले.या शिबिरासाठी पै अमोल वाघ,पै सुनील कोळी,पै नेमिनाथ मगदूम,अनिल चौगुले, सोनाजी थोरवत ,संतोष जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!