ताज्या घडामोडी

चांदवड मनमाड रोडवर रेणुका लॉन्स जवळ डिव्हायडर ला धडकून डिझेल टँकर पलटी. सुदैवाने जीवितहानी नाही.*

*चांदवड मनमाड रोडवर रेणुका लॉन्स जवळ डिव्हायडर ला धडकून डिझेल टँकर पलटी. सुदैवाने जीवितहानी नाही.*
पोलीस टाईम्स न्युज/ सुनिलआण्णा सोनवणे

*चांदवड:* सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान चांदवड कडून मनमाड कडे जाणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या डिझेल टँकरला चांदवड मनमाड रोडवर शहरातील रेणुका लॉन्सच्या जवळ रस्त्याच्या डिव्हायडरला धडक दिल्याने अपघात झाला आहे.

त्यात टँकर क्रमांक एम एच 41 बीके 94 02 चा चालक टँकर घेऊन जात असताना पिकअप गाडी ओव्हरटेक करताना त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो टँकर समोर डिवाइडरवर आदळल्याने रस्त्याच्या समोरून येणाऱ्या बाजूस पलटी झाला आहे. यात टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातानंतर या ठिकाणी चांदवड पोलीस स्टेशनचे पीएसआय सुरेश चौधरी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह पाहणी करून अपघाताची चौकशी केली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून अपघाताची पुढील चौकशी चांदवड पोलीस स्टेशन करत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!