ताज्या घडामोडी

प्राण्यांच्या संरक्षणार्थ ममदापूर चौफुलीवर संरक्षक चौकी देण्यात यावी ..

जिल्यातील सर्वांना परिचित असलेलं येवला तालुक्यातील पर्यटकांच आकर्षण असलेलं ममदापूर राखीव वन संवर्धन क्षेत्र येवल्याच्या उत्तर- पूर्व भागातील हजारो हेक्टर विस्तीर्ण असे वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रातील हजारोंच्या संख्येने हरीण, काळवीट, मोर, लांडगा, नीलगाय विविध प्रकारच्या वन्यजीवांचा संचार आहे. निसर्गाने दिलेला या भागातील एक मोठा अनमोल ठेवा आहे. या भागातील वन्य प्राण्यांचे संवरक्षण होण अत्यंत गरजेचे आहे. या भागातील वन्य प्राण्यांचे संवरक्षण होण्यासाठी ममदापूर येथिल चौफुलीवर वनविभागाची एक संरक्षक चौकी होणे. अत्यंत गरजेचे आहे. ममदापूर मार्गे  औरंगाबाद -वैजापूर, अंदरसुल, येवला, मनमाड, नांदगाव मार्गाला जोडून आहे. जवळचा मार्ग म्हणून ममदापूर मार्गे रहदारी असते. त्यामूळे नेहमी घात, अपघात घडत असतात. त्यामूळे वन्य प्राण्यांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ममदापूर संवर्धन क्षेत्रातील वन्य प्राण्यांचा संरक्षण होण अत्यंत गरजेचे आहे. त्यामूळे ममदापूर येथिल चौफुलीवर वनविभागाची संरक्षक नेमून चौकी उभारण्यात यावी. जेणेकरून वन्य प्राण्यांच रक्षण होईल. विविधता टिकवून ठेवणे हे वन्य जीवांच्या रक्षणाचे परंपरागत उद्दिष्ट आहे. वन्य जीवांच्या बरोबरीने पृथ्वीतलावर मानव गुण्यागोविंदाने नांदत आला आहे. राजापूर वन विभागात वसाहतीमध्ये एकही कर्मचारी राहत नाही त्यामुळे वसाहत धूळ खात पडली आहे राजापूर ममदापूर संवर्धन मध्ये रोजगार हमीचे कामे मजूर ऐवजी जेसीबीने केले आहे राखीव वन संवर्धनाच्या निधीमध्ये बराच गैरव्यवहार झाल्याचे समजते. सदर या प्रकरणाची वरिष्ठान कडून चौकशी करण्यात यावी. असी मागणी गणेश ज्ञानदेव-

देविदास गुडघे
प्रवीण साबळे
महेश केरे
बाळासाहेब साबळे ,आदीनी केली आहेत

“या भागातील वनजंगल व तेथील वन्यसंपदा आमच्यासाठी भूषण आहे.शासन त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करते मात्र येणारा निधी योग्यप्रमाणे खर्च होत नाही.शिवाय वन्यप्राणी देखील पूर्णता सुरक्षित नाहीत.त्यामुळे सर्व निधी योग्य पद्धतीने खर्च होणे गरजेचे असून येथे झालेल्या वेगवेगळ्या कामातील सर्व गैरप्रकाराची चौकशी होण्याची गरज आहे.येथे न्याय न मिळाल्यास आम्ही वनमंत्र्यांपर्यंत दाद मागणार असून प्रसंगी आंदोलन ही करू”
– देविदास गुडघे पाटील, सामाजिक कार्यकर्ते,ममदापूर

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!