ताज्या घडामोडी

अकस्मात मृत्यु वरुन सदरचा खुनाचा उलगडा झाला एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी

प्

एम.आय.डी.सी. पो. स्टे जळगाव दिनांक ११/०७/२०२३

दिनांक ०२/०७/२०२३ रोजी राहुल उर्फ गोलु युवराज भिल हा कंडारी ता. जळगाव येथून सकाळी १०.०० वाजता घरून गेला होता. त्यांनतर गावातील लोकांनी त्यास सायंकाळी ०७.३० वाजे नंतर गावात फिरतांना पाहिले होते. त्यानंतर तो घरी आला नव्हता म्हणून त्याचे वडील युवराज भिल यांनी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे दिनांक ०६/०७/२०२३ रोजी मिसिंग खबर केली होती त्याच दिवशी सायंकाळी ०५.०० वाजता राहुल उर्फ गोलू याचे प्रेत हे रायपुर तालुका जळगाव शिवारातील पाटचारीजवळ संशयास्पदरित्या मिळुन आले होते. सदर बाबत एम.आय.डी.सी पो.स्टे जळगाव ला अकस्मात मृत्यु दाखल करण्यात आला होता.

सदर प्रेत हे संशयास्पदरित्या मिळून आल्याने राहुल उर्फ गोलू याचा कोणीतरी खुन केल्याबाबतची खात्रीशीर मीहिती मिळाल्याने त्या अनुषंगाने एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन कडुन तपास सुरु होता. तेव्हा अशी माहिती मिळाली की, दिनांक ०२/०७/२०२३ रोजी मयत राहुल उर्फ गोलु हा गावातील राहणारा जयराम धोंडु कोळी व बादल परदेशी यांचे बरोबर दिवसभर दारु पित असल्याबाबतची माहिती व जयराम धोंडु कोळी याचा राहुल उर्फ गोलू याच्याशी वाद झाला होता वादमध्ये जयराम याने राहुल उर्फ गोलू यास मारहाण केल्या बाबतची माहिती मिळाली होती. तसेच सदर ठिकाणी जयराम धोंडु कोळी याचा मित्र भूषण उर्फ भुरा पाटील रा. बराडसिम ता. भुसावळ जि. जळगाव हा देखील आल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्यास काल दिनांक १०/०७/२०२३ रोजी वराsसिम येथून ताब्यात घेतले होते. व त्याची अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन चौकशीत त्याने दिनांक ०२/०७/२०२३ रोजी रात्रीच्या वेळेस ०८.३० वाजेच्या सुमारास कंडारी गावातुन राहुल उर्फ गोलू यास मोटार सायकलवर मध्यभागी बसवून घेवून गेलो मोटार सायकल ही जयराम चालवत होता व मी मागे बसलो होतो. आम्ही त्याला संध्याकाळी त्याने जयराम याच्याशी भांडण केल्याने या कारणाने रागाच्या भरात मारहाण केली होती व त्यामध्ये तो जागेवर मेला होता त्यावेळी त्याची ओळख पटुनये म्हणून त्याचे प्रेत हे पाटचीराच्या खाली असलेल्या पाईपामध्ये लपवुन दिले होते व पाईपाला दोन्ही बाजुने दगड लावुन दिले होते तेसेच जयराम याने राहुल याचे अंगावरील कपडे काढून कुठेतरी फेकुन दिले होते. बाबतची माहिती सांगितली होती. म्हणुन सदर बाबतीत मयत राहुल उर्फ गोलू याचे वडील युवराज दलपत भिल रा. कंडारी ता. जळगाव यांनी दिलेल्या फिर्याद वरुन एम. आय. डी. सी. पो. स्ट ला दोघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा हा पुढिल तपास कामी नशिराबाद पोलीस स्टेशन ता. जि. जळगाव येथे वर्ग करण्यात आलेला आहे.

सदर एम.आय.डी.सी पो.स्टे जळगाव ला दाखल असलेल्या अकस्मात मृत्यु वरुन सदरचा खुनाचा उलगडा झाला आहे. सदरची कार्यवाही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदिप गावीत सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे सो, पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलीस उपनिरीक्षक रविद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, ईमान सैय्यद, तुषार गिरासे, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, मुदस्सर काझी, सचिनपाटील,साईनाथ मुंढे, पोलीस चालक ईम्तियाज खान, चालक मनोज पाटील, जगदिश भोई अशांना केले आहे. सदर घटनास्थळी कोणताही पुरावा नसतांना एम.आय.डी.सी पोलीस स्टेशने कंडारी गावात सलग ३ दिवस माहिती काढुन सदरचा खुन उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्ह्यतील जयराम धोंडु कोळी हा नशिराबाद ला दाखल असलेल्या दुस-या गुन्ह्यात यापुर्वी अटक आहे. भुषण याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढिल तपास नशिराबाद पो.स्टे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!