ताज्या घडामोडी

मनमाड येथे 23 सप्टेंबरला सविंधानावर चर्चासत्र, कायदेतज्ज्ञ ऍड.असीम सरोदे उपस्थित राहणार

मनमाड येथे 23 सप्टेंबरला सविंधानावर चर्चासत्र, कायदेतज्ज्ञ ऍड.असीम सरोदे उपस्थित राहणार!

देशात सविंधानावर विविध चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदगांव तालुक्यातील नागरिकांना भारतीय
सविंधानाच्या मानवी मूल्याविषयी मार्गदर्शन व्हावे या हेतूने मनमाड शहरात दि २३ सप्टेंबर२०२३रोजी सोनावाला लॉन्स, नांदगाव रोड, सोनावाला नगर,मनमाड येथे सविंधानावर चर्चासत्र आयोजीत करण्यात आले आहे. सदर चर्चा सत्रास मार्गदर्शन करण्यासाठी देशातील सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अधिवक्ता ऍड असीम सरोदे(पुणे )उपस्थित राहणार असून नांदगाव तालुक्यातील नागरिकांनी सदर चर्चासत्रास उपस्थित राहावे असे आवाहन मानवतावादी बहुउद्देशीय संस्था नाशिक येथील प्रतिभा तायडे,आर आर जगताप, बाळकृष्ण दाणी आणि मनमाड येथील इंडिया बचाओ सविंधान संवर्धन समिती तर्फे करण्यात आले आहे.
या संदर्भात दि 08/09/2023 रोजी मनमाड शहरातील सर्व सविंधान प्रेमी कार्यकर्त्यांची बैठक मनमाड नगरपरिषदेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली, सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे होते तसेच राष्ट्रीय सेवादलाचे राजाभाऊ जाधव,माजी नगरसेवक सादिक भाई पठाण,माजी नगरसेवक संजय भालेराव, निलेश सपकाले, फिरोज शेख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी संजय भालेराव, फिरोज शेख,निलेश सपकाले, अमीन शेख,नरेंद्र कांबळे,अमोल खरे,सिध्दार्थ जोगदंड,श्रीकृष्णा पगारे, संदीप धिवर, पंढरीनाथ पठारे इत्यादी सविंधान प्रेमी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर बैठकीत नियोजन समिती एकमताने निवडण्यात आली,सदर समितीच्या अध्यक्षपदी फिरोज शेख,कार्याध्यक्ष पदी संजय भालेराव,सचिवपदी गुरुकुमार निकाळे, कोषाध्यक्षपदी निलेश सपकाळे, उपाध्यक्ष पदी नरेंद्र कांबळे, श्रीकृष्णा पगारे,सिद्धार्थ जोगदंड, उपससचिव पदी जावेद शेख यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी सादिक भाई पठाण यांनी एकात्मता चौक येथून कार्यक्रम स्थळी राष्ट्रीय एकात्मता यात्रा काढण्यात यावी अशी सूचना दिली जी सर्वमताने मान्य करण्यात आली आहे.
सदर बैठकीत निलेश वाघ,अशोक बिदरी प्रवीण अहिरे,शब्बीर शेख,इस्माईल पठाण,सुनील सोनवणे,अर्जुन बागुल, शकुर शेख, जावेदभाई शेख,संदीप पगारे,कल्याण धिवर,रोहित भोसले,श्री निरभवणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,सदर बैठकीचे सुत्रसंचलन सतीश केदारे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!