ताज्या घडामोडी

के एस टी नशिराबाद उर्दू शाळेतील मुलांचे दाखले त्वरित द्या अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू*

*के एस टी नशिराबाद उर्दू शाळेतील मुलांचे दाखले त्वरित द्या अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू*
*पालकांचा घेराव करताच प्रशासक नियुक्ती*
जळगाव शहराला लागून असलेल्या नशिराबाद येथील के एस टी उर्दू हायस्कूल मधील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नसल्याने २ जून पासून शाळा सोडल्याचा दाखला मिळत नव्हता विद्यार्थ्याना पुढील शिक्षणापासून शिक्षण संस्थेच्या हलगर्जीपणामुळे वंचित राहावे लागत असल्याने जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बीरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात पालकांचे शिष्टमंडळाने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन घेराव घातला असता उपशिक्षणाधिकारी रागिनी पाटील यांनी त्वरित आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून पालकांना १० जूनच्या संध्याकाळपर्यंत दाखले न मिळाल्यास मुलांच्या भरून न निघणाऱ्या नुकसानास शिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद येथील शैक्षणिक विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे जबाबदार राहतील व ११ जून पासून आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू अशी तक्रार केली.
*शिक्षण विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून तडकाफडकी नियुक्ती*
जी प शिक्षण विभागाने त्वरित जळगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी शेख खलील यांची के एस टी उर्दू हायस्कूल नशिराबाद येथे पुढील आदेश पावेतो त्यांना शाळेतील प्रशासकीय कार्य करण्याचे अधिकार दिले तसेच शाळा प्रवेश व इतर प्रशासकीय हक्क सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहे.

अशा प्रकारे के एस टी उर्दू हायस्कूलच्या प्रशासक पदी शिक्षण विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

*शिष्ट मंडळात यांचा होता समावेश*
फारुक शेख अध्यक्ष जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी, सय्यद वासिफ अली निसार अली, मोहम्मद रइस सय्यद महबूब, शेख मुजम्मिल हारून, शेख मुजाहिद रज्जाक, फझल अब्दुल रज्जाक, सादिक शेख सुपडू आदींची उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन
उपशिक्षण अधिकारी रागिणी पाटील यांना घेराव करून तक्रार सादर करताना फारुख शेख,जुनेद शेख,रईस शेख आदि दिसत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!