ताज्या घडामोडी

गणपती बाप्पा मोरया* गणपती प्राणप्रतिष्ठापना विधान

गणपती बाप्पा मोरया*
गणपती प्राणप्रतिष्ठापना विधान

मी नचिकेत जोशी
( गुरुजी )
९८९२६१०६६१

गणपतीच्या पहिल्या दिवशी खूप जणांकडे गणपती बाप्पाची स्थापना असते.

परंतु बरेच वेळा काही अपरिहार्य कारणामुळे त्यादिवशी स्थापनेच्या पूजेसाठी गुरुजी उपलब्ध होत नाहीत.

ज्यांना अगदीच गुरुजी मिळण्याची अडचण असेल त्यांनाही मदत व्हावी या शुद्ध हेतूने मी गणपती स्थापनेचे अतिशय सोप्या शब्दात स्वतः लिहिलेले विधान आपल्याला देत आहे.
जेणेकरून आपण घरच्या घरी स्वतःच्या गणपतीची स्थापना करू शकता.

आपण किंवा आपल्या परिचयात असे अडलेले कोणी यजमान असतील तर त्यांना हे मार्गदर्शन निश्चितच उपयोगी पडेल.

*गणपती बाप्पा मोरया*
गणपती प्राणप्रतिष्ठापना विधान

आचमन, 3 वेळा पाणी प्यावे, 1 वेळा सोडावे.
केशवाय नमः,
नारायणाय नमः,
माधवाय नमः
गोविंदाय नमः.
असे 2 वेळा करावे.
यजमानाला गंध लावावे

( एकूण ५ विडे आणि १ नारळ मांडावे )
कुलदेवता आणि ग्राम देवता ह्यांची नावे विचारून घ्यावीत आणि त्यांचे नाव घेऊन पाणी सोडावे.

यजमानाचे कुलदेवतेसाठी नारळ-विडा द्यावा.
यजमानांच्या ग्राम देवतेला,
मुंबा देवी, जागेवाला, वास्तुपुरुष ह्यांना केवळ एक एक विडा द्यावा.

( यजमानाला हातात अक्षता द्याव्यात )
श्रीमद भगवतो विष्णूराज्ञा, प्रवर्त मानस्य, द्वितीय परार्धे, विष्णूपदे श्री श्वेत वाराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, अष्टा विंशती तमे, कलियुगे – कली प्रथम चरणे, भरत वर्षे – भरत खंडे, जंबु द्विपे, देशे गोदावर्याहा: दक्षिण तीरे, शालिवाहन शके अस्मिन वर्तमाने, शोभन नाम संवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतु, भाद्रपद मासे, शुक्ल पक्षे, चतुर्थी तीथौ, भौम वासरे, स्वाती दिवस नक्षत्रे, वैधृती योगे, विष्टी करणे, तूळ राशी स्थीते वर्तमाने चंद्रे, कन्या राशी स्थिते सुर्ये, मेष स्थिते गुरू, एवं ग्रह विशेषण विशीष्ठायां शुभ पुण्यतिथौ….

संकल्प करावा. ( यजमानकडून म्हणवून घ्यावे )

“मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्रापत्यर्थम मम …. ( यजमान गोत्र उच्चार ) गोत्रस्य ……
( यजमान नाव उच्चार ) नामा अहं,
प्रति वार्षिक विहितेन अद्य भाद्रपद मास शुक्ल चतुर्थी व्रत महा पर्व निमित्तकं श्री सिद्धिविनायक कृपा प्रसादार्थम यथा मती यथा ज्ञानेन प्राण प्रतिष्ठा पूर्वक ध्यान आवाहन आदी षोडशोपचारे पूजन अहं करिष्ये.”

हातातील अक्षता पाण्यासोबत खाली सोडावे.

कलश,घंटा, दीप पूजन करावे. त्यांना गंध फुल वहावे.

गणपतीच्या मूर्तीला यजमानाने उजवा हात लावावा, डावा हात स्वतःच्या हृदयाला लावावा, पुढील मंत्र ३ वेळा म्हणावा.

“अस्य प्राणा प्रतिष्ठन्तु अस्य प्राणा क्षरन्तुच, अस्ये देवत्वम आचार्ये माम देही न कश्चंन”

गणपतीला गंध फुल वहावे, गणपतीच्या डोळ्यांना दुर्वेने थोडे तूप लावावे,
पाव वाटी नुसता दुधाचा नेवेद्य दाखवावा.
( ते दूध ओतून टाकावे, तीर्थ म्हणून घेऊ नये )

पूजा सुरू …..

( वक्रतुंड महाकाय …. हा मंत्र म्हणत म्हणत प्रत्येक उपचार करावा )

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः आवाह्यामी
पायापासून मस्तका पर्यंत तांदूळ वहावेत

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः आसन स्थाने अक्षतां ..

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः पाद्यम समर्पयामि
दुर्वेने देवाच्या पायावर पाणी शिंपडावे.

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः अर्घ्यम समर्पयामि
दुर्वेने ४ हातांवर पाणी

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः आचमनियं समर्पयामि
दुर्वेने मुखावर पाणी

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः स्नानियं समर्पयामि
दुर्वेने सर्व अंगावर पाणी

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः पंचामृत स्नानियं समर्पयामि
दुर्वेने पायावर ५ वेळा पंचामृत शिंपावे
नंतर
दुर्वेने पायावर-सर्वांगावर थोडे थोडे पाणी शिंपत राहावे
अथर्वशीर्ष 1 वेळा म्हणावे.

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः सु प्रतिष्ठितं अस्तू
अक्षता वाहव्यात

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः वस्त्रं समर्पयामि
कापसाचे वस्त्र घालावे

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः यज्ञ उपवितं समर्पयामि
जानवे घालावे

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः चंदनं समर्पयामि
गंध लावावे

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः सर्व अलंकार समर्पयामि
कंठी (फुलांची नाही)/ नानाविध अलंकार घालावेत

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः हरिद्रा कुंकूमम समर्पयामि
पायावर हळद कुंकू वहावे

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः दुर्वांकुर -पुष्पम समर्पयामि
दुर्वा फुले फुलांचा हार/ कंठी वाहावी.
तुळस बेल पत्र वहावे.

*इतर सर्व विविध पत्री आणली असल्यास वाहावी.*

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः धुपम समर्पयामि
उदबत्ती

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः दिपम समर्पयामि
तुपाचा दिवा

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः नैवेद्यम समर्पयामि
नैवेद्य गूळ खोबरे/ मोदक इ.
जेवणाचा नाही.

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः मुखवासार्थे पुगीफल-तांबूल समर्पयामि
विडा सुपारी वर पाणी सोडावे.

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः नानाविध फलं समर्पयामि
फळांवर पाणी सोडावे.

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धिविनायकाय नमः इदम नारीकेन महाफलम समर्पयामी
नाराळावर पाणी सोडावे

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः प्रदक्षिणाम समर्पयामि

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः साष्टांग नमस्कारां समर्पयामि

वक्रतुंड महाकाय…….
श्री सिद्धीविनायकाय नमः प्रार्थना
हातात अक्षता घेऊन , प्रारंभी विनंती करू गणपती..
म्हणावे

अनेन कृत पूजनेन तेन श्री सिद्धीविनायक देवता प्रियंताम..
हातावरून पाणी खाली सोडावे.

गणपतीच्या 2 आरत्या कराव्यात.

मंत्र पुष्पांजली म्हणावी

पूजा समाप्त

सौजन्य :-
नचिकेत जोशी
९८९२६१०६६१

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!