ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…..* *येवला तालुक्यातील जलसंधारणाच्या २० कोटी ८२ लक्षच्या ३३ बंधाऱ्यांच्या कामांची स्थगिती उठविली*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…..*

*येवला तालुक्यातील जलसंधारणाच्या २० कोटी ८२ लक्षच्या ३३ बंधाऱ्यांच्या कामांची स्थगिती उठविली*

*येवला तालुक्यातील सिंचन क्षमतेत होणार अधिक वाढ; तालुक्यातील ३३ बंधाऱ्यासाठी २० कोटी ८२ लक्षचा निधी*

*नाशिक, येवला, दि. ५ ऑगस्ट:-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील सिंचनाच्या २० कोटी ८२ लक्ष रुपयांच्या ३३ सिमेंट कॉंक्रीट बंधाऱ्यांच्या कामांची स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील या ३३ गेटेड सिमेंट कॉंक्रीट बंधाऱ्यांच्या कामाची लवकरच सुरुवात होऊन येवला तालुक्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होणार आहे.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून येवला तालुक्यातील शून्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमतेच्या एकूण ३३ गेटेड सिमेंट कॉंक्रीट बंधाऱ्यासाठी एकूण २० कोटी ८२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. या कामांना स्थगिती देण्यात आल्याने ही कामे थांबली होती. मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा पाठपुरावा करून या कामांची स्थगिती उठविण्यात आली आहे.

यामध्ये येवला तालुक्यातील खरवंडी १ बंधाऱ्यासाठी ५५ लक्ष ४० हजार, खरवंडी २ बंधाऱ्यासाठी ६१ लक्ष ७९ हजार, खरवंडी ३ बंधाऱ्यासाठी ६१ लक्ष ३४ हजार तर खरवंडी ४ बंधाऱ्यासाठी ५८ लक्ष ८० हजार, खरवंडी ७ बंधाऱ्यासाठी ६२ लक्ष ६ हजार, खरवंडी ८ बंधाऱ्यासाठी ६८ लक्ष २६ हजार, खरवंडी ९ बंधाऱ्यासाठी ५६ लक्ष ६६ हजार, खरवंडी १० बंधाऱ्यासाठी ७५ लक्ष ९ हजार, खरवंडी ११ बंधाऱ्यासाठी ६२ लक्ष ३३ हजार निधी मंजूर करण्यात आला आहे.

रहाडी ३ बंधाऱ्यासाठी ६६ लक्ष २५ हजार, रहाडी ४ बंधाऱ्यासाठी ७० लक्ष ४४ हजार, रहाडी ५ बंधाऱ्यासाठी ६६ लक्ष ७१ हजार, रहाडी ६ बंधाऱ्यासाठी ५८ लक्ष ७९ हजार, रहाडी ७ बंधाऱ्यासाठी ४४ लक्ष ६ हजार, रहाडी बंधाऱ्यासाठी ५९ लक्ष ६७ हजार, रहाडी ९ बंधाऱ्यासाठी ६० लक्ष ५६ हजार, रहाडी १० बंधाऱ्यासाठी ६५ लक्ष ६३ हजार, ममदापूर १ बंधाऱ्यासाठी ६० लक्ष ८ हजार, ममदापूर २ बंधाऱ्यासाठी ६० लक्ष १६ हजार, ममदापूर ३ बंधाऱ्यासाठी ६२ लक्ष ६ हजार, ममदापूर १० बंधाऱ्यासाठी ६० लक्ष ४२ हजार, ममदापूर ११ बंधाऱ्यासाठी ५० लक्ष ६१ हजार, ममदापूर १२ बंधाऱ्यासाठी ४८ लक्ष ७० हजार, ममदापूर १३ बंधाऱ्यासाठी ६६ लक्ष २७ हजार, ममदापूर १४ बंधाऱ्यासाठी ५३ लक्ष ५७ हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

तसेच सोमठाण जोश ५ बंधाऱ्यासाठी ७० लक्ष १० हजार, सोमठाणजोश ६ बंधाऱ्यासाठी ६२ लक्ष ७५ हजार, सोमठाणजोश ७ बंधाऱ्यासाठी ५२ लक्ष ६ हजार, सोमठाण जोश गावठाण ८ बंधाऱ्यासाठी ६९ लक्ष २ हजार, सोमठाण जोश ९ बंधाऱ्यासाठी ५७ लक्ष २६ हजार, चांदगाव १ बंधाऱ्यासाठी ७२ लक्ष ८७ हजार, चांदगाव २ बंधाऱ्यासाठी ७७ लक्ष ८४ हजार तर अनकाई बंधाऱ्यासाठी ९३ लक्ष ६५ हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या जलसंधारणाच्या विकासकामांमुळे येवला तालुक्यातील सिंचन क्षेत्रात अधिक वाढ होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!