ताज्या घडामोडी

नेहरू नगरात दोन लाखांची कार अज्ञात चोरट्यांनी लांबविली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नेहरू नगरात दोन लाखांची कार अज्ञात चोरट्यांनी लांबविली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील नहरुनगरात राहणाऱ्या व्यवसायिकाची २ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट कार अज्ञात चोरट्यांनी घरासमोर चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
या संदर्भात बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जळगाव शहरातील नेहरूनगर हेमंत मिठाराम बारी ( वय-४९) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे स्टील वर्क नावाची फॅक्टरी त्यावर त्यांच्या उदरनिर्वाह चालतो. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीएफ ०९७४) क्रमांकाची सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार आहे. मंगळवारी फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घरासमोर हेमंत बारी यांनी कार पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २ लाख रुपये किंमतीची कार चोरून नेली. हेमंत बारी यांची पत्नी सीमा बारी या बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता उठल्यानंतर कार जागेवर दिसून आली नाही. त्यानंतर हेमंत बारी यांनी कारचा सर्वत्र शोध घेतला परंतु कार कुठेही मिळून न आल्याने अखेर सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पो.हे.कॉ अल्ताफ पठाण करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!