ताज्या घडामोडी

श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालय, चांदवड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव

*श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालय, चांदवड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा* ..

पोलीस टाईम्स न्यूज/ सुनिलआण्णा सोनवणे

*चांदवड* : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने विद्यालयात विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावाच्या मध्यवर्ती भागातून छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ,बाल संभाजी, दादोजी कोंडदेव,कलश व तुळसी वृंदावन घेतलेल्या मुली, छत्रपतींचे मावळे यांची आकर्षक वेशभूषा धारण करून मोठ्या उत्साहात लेझीम व ढोलताशांच्या गजरात सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांबरोबरच श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालयाचे प्राचार्य लोहकरे सर,पर्यवेक्षक आहेर सर,अभिनव बालविकासचे मुख्याध्यापक जमदाडे सर,उच्च माध्यमिक, माध्यमिक व अभिनव बालविकास शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, कॉलेजचे सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ यांनी ही मोठ्या उत्साहात मिरवणुकीत सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत शिक्षिका श्रीमती कोतवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा व शिवजन्मोत्सव आणि शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती नांदे मॅडम व प्रा.टर्ले यांनी केले तर आभार प्रा.श्री टर्ले यांनी मानले.

शिवजयंतीच्या सोहळ्यास उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच अभिनव बालविकास मंदिरचे अध्यक्ष व सर्व सदस्य, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, ग्रामस्थ , सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!