ताज्या घडामोडी

शिर्डीत समस्थ मुस्लीम बांधवा कडून पाऊस पडण्या साठी दुवा पार्थना… गफ्फारखान शिर्डीत शुक्रवार याने जुम्माह नमाज पठण करून समस्थ मुस्लिम बांधवानी ईदगाह मैदानावर येऊन परत तेथे नमाज पठण केली.

शिर्डीत समस्थ मुस्लीम बांधवा कडून पाऊस पडण्या साठी दुवा पार्थना… गफ्फारखान
शिर्डीत शुक्रवार याने जुम्माह नमाज पठण करून समस्थ मुस्लिम बांधवानी ईदगाह मैदानावर येऊन परत तेथे नमाज पठण केली. जामा मस्जिद चे मन्सूर मौलाना यांनी सुमारे तीन वाजेच्या दर्मीयन ईश्वर अल्लाह कडे दुवा मागण्यासाठी सुरुवात केली त्यावेळी मौलाना सहित मुस्लिम बांधवाना रडू कोसळे, मौलाना दुवा मंगताना सांगत होते अय ईश्वर अल्लाह समस्थ मानव जाती साठी पशु पक्षि करिता जिथे जिथे पाऊस नाही तेथे फायदा देणारा पाऊस पडू दे.इतका ही नको देऊ समस्थ जातीला त्रास होईल. आमच्या कडून काही चुका झाल्या असतील तर आम्हा समस्थ जातीला माफ कर. मानव जातीवर दया कर. व नफा देणारा भरपूर पाऊस पडू दे.. प्रत्येक मनुष्य आकाश्या कडे डोळे लावून आहे. तीन महिने होण्यात आले आहे ये ईश्वरा तुजी कृपा दृष्टी कर समस्थ जीव जातीवर.

त्यातच IMD कडून प्राप्त झालेला पुढील 4 आठवड्यांचा हवामान अंदाज- किमान पुढील दोन आठवडे पाऊस नाहीच, त्यानंतरही समाधानकारक पाऊस नाही. एकंदरीत, परिस्थिती चिंताजनकच आहे.

उपलब्ध पाण्याचा चिंताजनक परीस्थिती समजून जपून वापर करावा असे नमूद करण्यात आले. पण मुस्लिम बांधवाना अल्लाह वर विश्वास आहे तो मुस्लिम समाजाची पार्थना वाया जाऊ देणार नाही कारण तो परम दयाळू परम कृपाळू आहे आपल्या भक्तांना निराश करणार नाही असे शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते गफ्फारखान आपल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.
तसेंच त्या वेळी मौलाना मन्सूर मौलाना अन्वर मौलाना मुबीन मौलाना जाकीर मौलाना अमजद. जामा मस्जिद चे अध्येक्ष शमशुद्दीन इनामदार. गफ्फारभाई पठाण. सलीम शेख मौलाना नईम, जावेद शेख. समीर शेख. शफिक शेख, फिरोज इनामदार, आसिफ शेख. आदी मान्यवर व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!