ताज्या घडामोडी
वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकच धम्माल केली.
वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकच धम्माल केली. विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील विविध कार्यक्रमास सहभाग नोंदवला व कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत, सामूहिक नृत्य, लोकगीत, पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रमासह हिंदी मराठी गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. वेळी कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची एकच गर्दी केली होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष डॉ अमृत पहिलवान यांच्या हस्ते करण्यात अले या प्रसंगी संस्थेचे संचालक संजय नागडेकर, सुधाशु खानापुरे, मुख्याध्यापक कदम आदींसह शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
साठी सचिन वखारे येवला