ताज्या घडामोडी

मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत एम.एस.जी.एस. ची तन्वी माळीला द्वितीय क्रमांक

*मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत एम.एस.जी.एस. ची तन्वी माळीला द्वितीय क्रमांक..*
**अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी तन्वी लक्ष्मण माळी इ.५वी हिने मंथन वेल्फेअर फाउंडेशनच्या परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावल्या बद्दल केतन कसबे (गोल्डमन, प्रसिद्ध फिल्म प्रोड्यूसर) व प्रवीण भोसले (विठ्ठला तूच फेम) यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या विशेष सहकार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, संचालक राजेंद्र गायकवाड, अंदरसुलच्या मा.सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ.विनिता अमोल सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कार समारंभ रविवार दि. २५/६/२०२३ रोजी राधाकृष्ण लॉन्स येवला येथे पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केतन कसबे (गोल्डमन, प्रसिद्ध फिल्म प्रोड्युसर), प्रवीण भोसले (विठ्ठला तूच फेम), आत्मा मालिक संस्थेचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे, निफाडचे नगरसेवक किरण कापसे, पंचायत समिती येवल्याचे विस्ताराधिकरी संजय कुसाळकर, मंथन समन्वयक येवला तेजस राऊत हे होते.*
*तसेच तन्वी लक्ष्मण माळी व संस्थेच्या या यशाबद्दल अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, संचालक राजेंद्र गायकवाड, मयूर सोनवणे, जीवन गाडे, डॉ. भगिनाथ जाधव, लक्ष्मण सोनवणे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, संगीताताई सोनवणे, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, प्रिन्सिपल अल्ताफ खान, अमोल आहेर, अजहर खतीब, दीपक खैरनार, अजीम पटेल, गणेश सोनवणे, सचिन घोडके, अविनाश बोडारे , माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, शोभा निकम सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!