एम एस जी एस इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी ( हुतात्मा दिन ) निमित्त आदरांजली.
एम एस जी एस इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी ( हुतात्मा दिन ) निमित्त आदरांजली.
मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली देण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मकरंद सोनवणे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.
यानंतर विद्यार्थी व शिक्षक अमोल आहेर सर यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी प्रिंसिपल अल्ताफ खान,गणेश सोनवणे,दीपक खैरनार,प्रशांत बिवाल,अजीम पटेल,गौरव सैंदाने,माधुरी माळी, सुनीता वडे,अर्चना एंडाईत,आलिया खान,शर्मिला पवार,नीलिमा देशमुख,यासह सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले.