रूकडीच्या खोत इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
रूकडीच्या खोत इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
हातकणंगले तालुका प्रतिनिधी/ राहुल घोलप
रूकडी ता. हातकणंगले येथील देशभक्त जींनाप्पा रायाप्पा खोत इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तहसिलदार कल्पना ढवळे, पोलिस निरीक्षक के.एन. पाटील यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्र झाला. स्कुलचा परिसर निसर्गरम्य व्हावा. मुलांना वृक्षाप्रति प्रेम वाढावे या हेतूने चोकाक गावचे प्रतिष्ठीत नागरीक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार श्री. शितल कांबळे यांनी वृक्षांची रोपे स्कुलला देणगी स्वरूपात दिली. स्कुल व्यवस्थापनाने यानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला. यावेळी तहसिलदार कल्पना ढवळे यांनी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी वृक्षांशी मैत्री केली पाहिजे. मानवाला निसर्ग हाच भरभरुन देतो याचा विसर पडत चालला आहे. शितल कांबळे यांनी वृक्षरोपांची अमूल्य देणगी दिल्याने ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत असे बोलताना मत व्यक्त केले. हातकणगले पोलिस निरिक्षक के.एन. पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून स्कुलच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी डॉ विजय पाटील, सचिन पाटील, शांतीनाथ मगदूम, मारूती कुंभार, क्षितिजा कुलकर्णी इ. पदाधिकारी तसेच राहुल घोलप, संदीप कोल्हे, संतराम खाबडे, रोहित पाटील, संतोष कोठावळे इ.पत्रकार बांधव व स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. कुंभार, पूनम कांबळे, अश्विनी पाटील, माधवी गावकर, सोनम कांबळे, सुप्रिया पाटील, रीना कांबळे, मानसी इ. शिक्षक शिक्षकेत्तर स्टाफ उपस्थित होता.