ताज्या घडामोडी

एम. एस. जी. एस. शिक्षण संकुलात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.*

प्रतिनिधी- सचिनवखारे , वखारे फोटो स्टुडीओ-

*एम. एस. जी. एस. शिक्षण संकुलात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल,सेमी इंग्लिश व ज्यु.कॉलेजमध्ये आपल्या देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षअरुण भांडगे हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरुण भांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर डॉ.भागीनाथ जाधव यांच्या हस्ते सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनांना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.अजहर खतीब यांच्या पाठीमागे उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.अमोल आहेर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. यानंतर ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात प्रथम क्रमांक पटकावले विद्यार्थी माधव ढोले,संस्कृती आहेर,मार्गदर्शक शिक्षिका अर्चना एंडाईत तसेच शिक्षक माध्यमिक गटात प्रथम क्रमांकअतिषय सुंदर सांस्कृतीक कार्यक्रम
पटकावलेल्या कु.रेणुका भागवत मॅडम यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यानंतर विद्यार्थिनींनी देशभक्ती गीते, लेझीम,कराटे डेमो,देशभक्ती फ्युजन सॉंग वर उत्कृष्ट असे नृत्य सादर केले.विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरणाने उपस्थित सर्व मंत्रमुग्ध झाले होते.अध्यक्षीय भाषणांत अरुण भांडगे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, अंदरसुल ग्रामपालिका मा. सरपंच व विद्यमान सदस्या सौ.विनिता अमोल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्या वैशाली शिंदे, संचालक जीवन शेठ गाडे, उज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, आकाश सोनवणे, जनार्दन जानराव, रामनाथकाका एंडाईत, कचरू पाटील गवळी, द्वारकानाथ सोनवणे, मालनबाई सोळसे, भागिनाथ थोरात, मारुती वाकचौरे, संदीप वाकचौरे, चिंतामणी भालेराव, रंगनाथ सोनवणे, अशोक एंडाईत, निवृत्ती ढोले, आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ खान, ज्यु.कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, गणेश सोनवणे, शिवप्रसाद शिरसाठ, दीपक खैरनार, प्रशांत बिवाल, अमजद अन्सारी, गौरव सैंदाने, मनिष सैंदाने, जितेश व्यवहारे, सुनील सपकाळ, सुनिल भागवत,अजीम पटेल, माधुरी माळी, सुनीता वडे, नीलिमा देशमुख, सुश्मिता देशमुख, आलिया खान,शर्मिला पवार यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना माकूने, समृद्धी आहेर, गौरी गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!