ताज्या घडामोडी

येवल्यात भव्य एकता मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न* *रंगपंचमीच्या रंगात एकतेचा रंग मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धेच्या माध्यमातून दिला ___डॉ.संजय आपराती*

*येवल्यात भव्य एकता मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न*

*रंगपंचमीच्या रंगात एकतेचा रंग मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धेच्या माध्यमातून दिला ___डॉ.संजय आपराती*

येवला शहरात आज सकाळी6:30वाजता शहरातील विंचूर चौफुलीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बॅरिस्टर संवेदन आपराती साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रथमच येवला शहरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती त्यात शहरातील नामवंत डॉक्टर वकील शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ए टी आय नितीन खंडागळे साहेब यांनी सर्वांना सूचना व मार्गदर्शन केले यावेळी डॉ. संजय अपरांती यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करत हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन ची सुरुवात केली यावेळी मॅरेथॉन स्पर्धा दरम्यान पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता तसेच डॉक्टरांची टीम अंबुलन्स स्वयंसेवक उपस्थित होते सदर मॅरेथॉनचे पाच किलोमीटर पार करत भव्य मंडपात पोचले यावेळी गणेश गोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सुदर्शन पवार यांनी दोन नंबर तर कृष्ण पाबळे याने तृतीय नंबर पटकावला मुलींमध्ये गीता कोकाटे गायत्री पाबळे छाया पवार सिमरन पठाण यांनीही बाजी मारली यावेळी त्यांना सन्मानपत्र व पारितोषिक डाॅ. संजय आपराती व बॅरिस्टर संवेदन आपराती साहेब महेंद्र पगारे डाॅ.महेश जोशी यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन महेंद्रभाऊ पगारे व डॉ. महेश जोशी यांनी केले होते यावेळी डॉ. जोशी म्हणाले की रंगपंचमीच्या निमित्ताने सर्व देशातील नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले तीन रंग त्याचे महत्त्व पटवून देत त्यासाठी आपले सर्व कसब पणाला लावण्याचे आव्हान केले तर महेंद्र पगारे बोलताना म्हणाले की येवला तालुका हा ग्रामीण भाग जास्त प्रमाणात असून होतकरू मुला मुलींना या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल एकतेचा संदेश देत स्पर्धकांना चालना देण्याचा प्रयत्न केला असून भविष्यातही अशा वेगवेगळ्या स्पर्धकांचे आयोजन करून नामवंत व्यक्तीचे मार्गदर्शन आपणाला देण्यासाठी प्रयत्नशील राहील आज पहिली सुरुवात असून याचा वडवृक्ष केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असे महेंद्र पगार यांनी बोलताना म्हटले
बॅरिस्टर सवेदन आपराती म्हणाले की मी गरजू व होतकरू मुलांनाकोणतीही मदत करेल व तुमचा उस्ताह बघून मला आनंद झाला
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. संजय अपरांती म्हणाले की मला आज आनंद होत आहे की येवला हे रंगपंचमीच्या माध्यमातून नाव असलेले शहर असून आज एकतेच्या रंगाने एकतेचा नाविन्य संदेश देत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन पगारे व जोशी यांनी केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धेची संधी उपलब्ध करून दिली शरीराला जशी व्यायामाची गरज आहे तसेच चांगला अभ्यास करून आपले नाव आपल्या शहराचे नाव राज्य व देशभरात झळकावे त्यासाठी हवी ती मदत व वेळोवेळी मार्गदर्शन मी करण्यास तयार आहे अशी आश्वासन डॉ. संजय आपराती यांनी आश्वासन दिले
यावेळी डॉ.भूषण शिनकर वैभव सोनवणे सर विजय घोडेराव सुरेश खळे विनोद त्रिभवन मयूर सोनवणे बाळासाहेब सोनवणे नंदू अहिरे मंगेश जोशी युवराज पगारे हरीश बनसोडे विजय पगारे बापूसाहेब वाघ सावंत साहेब सोमनाथ मोरे सौ.आशा आहेर सौ. वनिता वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!