ताज्या घडामोडी

येवल्यात सहस्रार्जुन भगवान जयंती

येवल्यात सहस्रार्जुन भगवान जयंती
सचिन वखारे:-
येवला : सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर सहस्रार्जुन भगवान जयंतीनिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. येथील क्षत्रिय समाजाच्या वतीने अभिषेक, महाआरती व श्रीसहस्रार्जुन भगवान यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली प्रारंभी सहस्रार्जुन प्रतिष्ठानचे सदस्य पांडुरंग भांडगे यांच्या हस्ते सपत्नीक श्रीसहस्रार्जुन भगवान व श्रीबालेश्वरीमाता यांचा ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषाने महाअभिषेक करण्यात आला. प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष गोविंद वाडेकर, उपाध्यक्ष रवींद्र चौधरी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन बाकळे, बालेश्वरी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष वसंत वडे, डॉ. किरण पहिलवान, प्रवीण पहिलवान, कल्पेश आगफाडे, विष्णू कोकणे, शेखर खेरुड यांच्या हस्ते करण्यात आले. दीपक वखारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन बाकळे, उपाध्यक्ष शेखर खेरूड, योगेश सांबर, सागर खानापुरे, सुमीत भांडगे, डॉ. किरण पहिलवान, प्रवीण पहिलवान, संजय फुलपगार, आदींनी संयोजन केले.

—————————–*———————————–भावपुर्ण श्रद्धांजली………दशक्रिया विधी…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!