ताज्या घडामोडी

*जि. प. शाळा.तांबडधोंडा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी*

*जि. प. शाळा.तांबडधोंडा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी*
सचिन वखारे, येवला
1 ऑगस्ट रोजी जि. प. प्राथमिक शाळा तांबडधोंडा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी विद्यार्थ्यांची लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी शालेय स्वच्छता आणि वृक्षारोपण या प्रसंगी केले.या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर नागरे, उपाध्यक्ष कैलास पाटोळे, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस ताई,लता मुंगसे, केंद्रप्रमुख संतोष मुंढे,शाळेचे मुख्याध्यापक प्रविण काकडे,अनिता खैरनार उपस्थित होते..सदर उपक्रमास तालुका गटशिक्षणाधिकारी संजयजी कुसाळकर साहेब, विस्तार अधिकारी सुनीलजी मारवाडी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!