ताज्या घडामोडी

_दानोळी कोथळी मळा वस्तीवरील शेतकरी भारनियमनामुळे त्रस्त

_दानोळी कोथळी मळा वस्तीवरील शेतकरी भारनियमनामुळे त्रस्त
संदिप चौगुले दानोळी,
पावसाने दडी मारल्याने शेतकरी अगोदरच संकटात सापडले आहेत तश्यात महावितरण ने
दानोळी,कोथळी मळा वस्तीवरील भारनियमन सुरू केले आहे महावितरण कडून कोणत्याही प्रकारची सूचना,किंवा आदेश पण नसताना भारनियमन सुरू केले आहे त्यामुळे पिकांना पाणी नियोजन कसे करावे असा प्रश्न मळा वस्तीवरील शेतकऱ्यांना पडला आहे शेती करायची तरी कशी हेच कळेना म्हणून दानोळी येथील शेतकऱ्यांनी कोथळी येथे महावितरण कार्यालयातच ठिय्या मांडला व रात्रपाळी चे वेळापत्रक अयोग्य आहे असे म्हणत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले पण महावितरणचे अधिकारीच म्हणाले की कंट्रोलरूम वरूनच लोडशेडींग चालू आहे आम्हाला यातील काहीच माहिती नाही असे म्हणाले त्यामुळे शेतकरी अधिकच संतापले.
काही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला याबाबतची माहिती कळवली लगेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी जयसिंगपूर महावितरण समोर ठिय्या आंदोलन सुरू केले व अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांना जाब विचारला भारनियमन कायचे असल्यास औद्योगिक वसाहतीसह सर्वच शिरोळ तालुक्यात भारनियमन करा फक्त शेतीलाच जर आपण वीज देत नसेल तर याचे राज्यभर पडसाद उमटतील असा इशारा देऊन चार दिवसात वीज पुरवठा सुरू करा तसे न केल्यास महावितरणचे सर्व कार्यालय उध्वस्त करू असा इशारा सावकार मादनाईक यांनी दिला. या आंदोलनात सावकार मादनाईक, रामचंद्र शिंदे,शरद बिरनाळे अशोक आनंदा,विशाल चौगुले स्वप्नील माणगावे,पायगोंडा आलमाने,सहभागी संदिप पुजारी,बंडु पाटील,यांच्यासह अनेक शेतकऱ्यानी सहभाग घेतला होता.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!