ताज्या घडामोडी

निवडनिवडणूक खर्च निरीक्षकांची येवल्यात भेट*

*निवडणूक खर्च निरीक्षकांची येवल्यात भेट*

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 20 दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या 119 येवला विधानसभा मतदारसंघात निवडणूक खर्च निरीक्षक निधी नायर यांनी भेट दिली.प्रथमतः अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन यांनी निधी नायर मॅडम यांचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान त्यांनी SST पथक, FST पथक व इतर पथकांच्या कामाचा बारकाईने आढावा घेतला. प्रत्येक पथकाने आपल्याला नेमून दिलेले काम चोखपणे आणि दक्षतेने करावे, येवला विधानसभा मतदारसंघाची हद्द इतर जिल्ह्यांना लागून असल्याकारणाने अशा ठिकाणी संशयास्पद वाहनांची कसून चौकशी करण्यात यावी.उत्पादन शुल्क विभागाने दररोज तपासणीचा रिपोर्ट निवडणूक कार्यालयाला सादर करावा. अशा सूचना यावेळी नायर यांनी दिल्या.

या बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन,सहायक खर्च निरीक्षक पुरुषोत्तम पाठराबे,येवला ग्रामीण पोलीस अधिकारी विमला एम., येवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी ,लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे ,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रकाश घायवात,नोडल अधिकारी बाबासाहेब शिंदे ,नायब तहसीलदार नितीन बाहीकर, निरंजना पराते ,विवेक चांदवडकर यांच्यासह इतर अधिकारी,सर्व पथकांचे प्रमुख व सदस्य उपस्थित होते.

*निवडणूक खर्च निरीक्षकांची तपासणी नाक्यास भेट*
*तहसील कार्यालयातील भेटीपूर्वी खर्चनिरीक्षक नायर यांनी तपासणी नाक्यास अचानक भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच येवला विधानसभा मतदार संघाच्या हद्दीतील सर्व तपासणी नाक्यावर संशयास्पद वाहनांची कसून चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी सर्व पथकांना दिल्या.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!