ताज्या घडामोडी

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून….. येवलेकरांच्या दिमतीला जिल्हा सत्र न्यायालयाचे वरदान

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून…..

येवलेकरांच्या दिमतीला जिल्हा सत्र न्यायालयाचे वरदान

दैनंदिन न्यायालयीन कामकाजासाठी निफाड किंवा मालेगाव येथे जाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी स्वतंत्रपूर्व काळापासून सुरू असलेल्या येवला न्यायालयाच्या आवारात आता येवला मतदारसंघाचे भाग्यविधाते आ. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या दमदार पाठपुराव्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाची भर पडली आहे.

सन 1876 यावर्षी येवला तालुक्यासाठी सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू करण्यात आले व त्यानंतर 1899 मध्ये कार्यालयासाठी इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. ब्रिटिश वास्तूतज्ञांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या इमारती माध्यमातून गेली 125 वर्ष न्यायदानाचे काम अविरतपणे सुरू आहे.

2004 नंतर या मतदारसंघात देखण्या स्वरूपाच्या आधुनिक इमारतींची उभारणी होत असतांना न्यायालयीन कामकाजासाठी वारंवार येणाऱ्या नागरिकांना एक सुखद दिलासा म्हणून येथील वातावरण आणि वास्तुरचना तरी रम्य असावी अशी संकल्पना भुजबळ यांनी मांडली. येथील अस्तित्वातील ब्रिटिशकालीन दगडी वास्तुस हानी न पोहोचवता जुन्या इमारतीशी सुसंगत आणि पर्यावरणाशी समतोल साधणारी नवीन इमारत उभारण्यात आली, इतकच काय सुर्याच्या दक्षिणायन, उत्तरायण परिक्रमेनुसार इमारतीची रचना करण्यात आली आहे. पाण्‍याचे कारंजे आणि हिरवागार बगिच्‍यांनी येथील वातावरणाला मनमोहक सौंदर्य प्राप्‍त करुन दिले आहे. जुन्या इमारतीसाठी रु. 91 लक्ष तर नवीन इमारतीसाठी रु.350 लक्ष रुपये खर्च करण्यात आला आहे.

न्यायालयीन कामकाजाकरीता निफाड व मालेगाव येथे वारंवार हेलपाटे मारून त्रस्त झालेल्या नागरिकांकडून तसेच वकील संघाकडून या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर करण्यात यावे, म्हणून सातत्याने मागणी होत असल्याने भुजबळ साहेबांनी पाठपुरावा सुरू केला होता. सन 2019 मध्ये उच्च न्यायालयाकडून येवला येथे जिल्हा सत्र न्यायालयांस मंजुरी देण्यात आली. त्यानंतर दोन वर्षे करोनामुळे प्रक्रिया बंद पडल्यानंतर सर्व कायदेशीर निकषांची पुर्तता करून आज दि. 2 एप्रिल 2023 रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. श्री नितीन सांबरे सो. यांच्या शुभहस्ते या येवला जिल्हा नाशिक येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे.

या मतदारसंघाचे भाग्यविधाते मा. आ. छगनराव भुजबळ साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे येवला मतदारसंघात मंजूर झालेल्या विविध शासकीय कार्यालयांच्या वैभवात या न्यायालयाच्या रूपाने भर पडणार आहे. वास्तविक गेल्या 10 वर्षांपुर्वीच या न्यायालयासाठी भव्य अशा इमारतीची निर्मिती करण्यात आली असून भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातूनच रु.125 लक्ष रुपये खर्चुन मा. न्यायमूर्तींसाठी निवासस्थानाचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे तर वकीलबार सदस्यांसाठी हॉल तसेच वाचनालय प्रस्तावित करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!