ताज्या घडामोडी

पाळधी गावातून तुफान दगडफेक; मोठा तणाव

पाळधी गावातून तुफान दगडफेक; मोठा तणाव

जळगाव शहरात पाळधी गावातून मंगळवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली. एका धार्मिक स्थळजवळुन काही जणं जात असताना अचानक दगडफेक झाली. या दगडफेक मध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. हल्लेखोरांनी तीन वहानांचे तसेच काही दुकानांची तोडफोड केली. घटनेनंतर पोलिसांच्या मोठा ताफा तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर काही जणांनी पाळधी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. हल्लेखोरांनी वाहन तसेच पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे यांच्या वाहनांची देखील तोडफोड केली. या घटनेची माहिती जळगाव पोलिसांना मिळाल्यानंतर जळगाव, धरणगाव, व चोपडा, येथून पोलिसांच्या अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला.
दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
रात्री ११:३० वाजेच्या सुमारास ज्या भागात दगडफेक झाली, त्या भागातील संशयितांना धरपकड केली. गावातील प्रत्येक चौकात पोलिसांच्या बंदोबस्त होता. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात काम सुरू होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!