ताज्या घडामोडी

एम. एस. जी. एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न.

*एम. एस. जी. एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न.

अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, संचालक प्रा.राजेंद्र गायकवाड, संचालिका संगीताताई सोनवणे, अंदरसुल ग्रामपालिकेच्या मा. सरपंच विनिता अमोल सोनवणे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन, सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना अमोल आहेर यांनी केली.यानंतर इ.आठवी च्या विद्यार्थिनींनी अजहर खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली “मन की वीणा से गुंजित” हे स्वागत गीत सादर केले.यानंतर नर्सरी ते इ.चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना रनिंग रेस, फ्रॉग जंप, लिंबू चमचा, होप जंप, बुक बेलेन्स, बॅक पुष या स्पर्धेत प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्याना पाहुण्यांच्या हस्ते सुवर्ण पदक, रजत पदक त्याच प्रमाणे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यानंतर ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हाऊस प्रमाणे बक्षीस देण्यात आले. यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, रनिंग, बॅडमिंटन, कबड्डी, कॅरम, चेस, मॅरेथॉन, रिले रेस,थाळी फेक, गोळा फेक, बॉली बॉल यामध्ये विजयी संघाला ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.त्याच प्रमाणे माजी उपमुख्यमंत्री छगणरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, शालेय स्तर विज्ञान प्रदर्शनात विजेते, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विजेते विद्यार्थी व शिक्षक, सहकार महर्षी गोविंदनाना सोनवणे यांच्या पुण्यतिथी निमित्त चित्रकला, निबंध, रांगोळी स्पर्धेत विजयी विद्यार्थी, येवला नगरपालिका आयोजित पथनाट्य स्पर्धेत विजयी विद्यार्थी व शिक्षक या सर्वांचा सत्कार दि.२४ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यानंतर संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाला पण महत्व दिले पाहिजे असे नमूद केले.
याप्रसंगी रामनाथ काका एंडाईत, द्वारकानाथ सोनवणे, भागीनाथ थोरात, डॉ. गणेश जेजुरकर, इंग्लिश मिडीयम प्रिंसिपल अल्ताफ खान, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, प्रशांत बिवाल, अजीम पटेल, सचिन घोडके, अमजद अंसारी, गौरव सैंदाने, मनिष सैंदाने,माधुरी माळी, सुनीता वडे, चेतना माकूने, आलिया खान, अर्चना एंडाईत, नीलिमा देशमुख, सुश्मिता देशमुख, शर्मिला पवार, शोभा निकम आदी सह सर्व विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व संचालक मंडळ, प्रिन्सिपल, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब,माधुरी माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!