ताज्या घडामोडी

चाळीसगाव :-तहसिलदार श्री. प्रमोदजी हिले यांनी सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम राबवून वीरमाता वीर पत्नी वीर पिता तसेच माजी सैनिक यांचा शेला व श्रीफळ देऊन सन्मान

*चाळीसगाव:,महसूल सप्ताह निमित्त आज दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी तहसील कार्यालयात *सैनिक हो तुमच्यासाठी* कार्यक्रम उपविभागीय अधिकारी मा.प्रमोद हिले सो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सदर कार्यक्रमास त्रिदल सेनेचे पदाधिकारी, विरमाता,विरपत्नी व मोठ्या संख्येने आजी/माजी सैनिक उपस्थित होते. यावेळी सर्व सैनिकांचे सवाद्य पुष्पवृष्टी करून स्वागत व सन्मान करण्यात आला.मौजे खडकी येथील विरपत्नी श्रीमती कविता शेळके यांना शासनाने मंजूर केलेल्या जमिनीचा ताबा देण्यात येऊन, 7/12 उतारा प्रांत सो यांच्या शूभहस्ते वितरीत करण्यात आला. सर्व उपस्थित सैनिक व महसूल अधिकारी यांच्यात सकारात्मक संवाद घडून त्यांच्या समस्यांची नोंद घेण्यात आल्याने सर्वांनी महसूल विभागाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
दि.5.08.2023
सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम राबवून वीरमाता वीर पत्नी वीर पिता तसेच माजी सैनिक यांचा शेला व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रमोद हिले उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील तहसीलदार चाळीसगाव संदीप पाटील पोलीस निरीक्षक चाळीसगाव जितेंद्र धनराळे नायब तहसीलदार श्री भरकर परीक्षा दिन तहसीलदार विकास वंजारी नायब तहसीलदार मेजर पी ए पाटील माजी सैनिक उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!