ताज्या घडामोडी

सावकाराने बळकावलेली १०० एक्कर जमीन शेतकऱ्यांना मिळाली परत……

सावकाराने बळकावलेली १०० एक्कर जमीन शेतकऱ्यांना मिळाली परत……

सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी

जळगाव – सावकाराने हडपलेली तब्बल १०० एक्कर जमीन शेतकऱ्यांना परत मिळाली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अवैध सावकारावर कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमिन परत मिळवून दिली आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी सावकाराकडे हात पसरले होते.
सावकाराने मोठे व्याज आकारून वेळोवेळी शेतकऱ्यांना पैसे पुरविले.
कर्जाची रक्कम वाढत गेली आणि शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांना आपल्या जमिनी सावकाराकडे गहाण ठेवाव्या लागल्या.
यातून सुटका मिळविण्याचा कुठलाही पर्याय शेतकऱ्यांना दिसत नव्हता.

जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावली.
अवैध सावकारी मधून सावकारांनी बळकावलेली ही जमीन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कारवाई करत संबंधित शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याचे आदेश काढले आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तसेच सावदा तालुक्यातील एकूण पंधरा शेतकऱ्यांची अशा पद्धतीने एकूण शंभर एकरावर जमीन सावकारांनी हडपली होती. सदरच्या जमिनीची कागदपत्रे संबंधित शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आले आहेत.
काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर घरे सुद्धा बांधण्यात आले होते. अशा जमिनींचे कोट्यवधी रुपयेसुद्धा शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेशित केले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!